"सॉरी आई, मी बिघडलोय, मला नवीन घर घ्यायचं होतं पण..."; तरुणाच्या सुसाईड नोटने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 09:41 AM2022-02-23T09:41:30+5:302022-02-23T09:43:09+5:30

Crime News : बीएचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.

Crime News ba student ate poison said thought winning online game would take home for parents but lost | "सॉरी आई, मी बिघडलोय, मला नवीन घर घ्यायचं होतं पण..."; तरुणाच्या सुसाईड नोटने खळबळ

"सॉरी आई, मी बिघडलोय, मला नवीन घर घ्यायचं होतं पण..."; तरुणाच्या सुसाईड नोटने खळबळ

Next

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. बीएचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. त्याने आत्महत्येआधी आपल्या बहिणीला मेसेज करून याबाबत माहिती दिली होती. तसेच सुसाईड नोटही लिहिली आहे. "सॉरी आई मी बिघडलो आहे, मला माफ कर, मला घरी यावस वाटत नाही, आणि कुठे जावसही वाटत नाही. मला घरातील परिस्थिती पाहवत नाही. जाऊ तर कुठे जाऊ...." असं तरुणाने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. त्याने आपल्या आईसाठी ही चिठ्ठी लिहिली.

घरातील आर्थिक स्थितीमुळे त्रस्त झालेल्या तरुणाला ऑनलाईन सट्ट्याचं व्यसन लागलं आणि यातच तो सर्व गमावून बसला. ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे इंदूरमध्ये या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने दोन पानी सुसाईड नोट लिहिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र वास्कले नावाचा हा विद्यार्थी खरगोन येथे राहणारा होता. इंदूरमध्ये भंवरकुआ भागात भाड्याने घर घेऊन अभ्यास करीत होता. तो बीएच्या द्वितीय वर्षात शिकत होता. सोबतच सिक्युरिटी गार्डची नोकरी करीत होता. त्याच्या घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. खूप पैसे कमावण्यासाठी तो ऑनलाईन जुगार खेळू लागला. 

सर्वच पैसे हारला; उचललं टोकाचं पाऊल अन्...

जुगार खेळण्यासाठी तो ऑनलाईन कंपनीकडून लोन घेतलं होतं. मात्र जुगारात तो सर्व पैसे हरला. कर्ज फेडण्यासाठी कंपनी त्याला सतत फोन करू लागली. यामुळे त्रस्त होऊन तरुणाने आत्महत्या केली. त्याने बहिणीला फोनवर सॉरी मेसेज लिहून माफी मागितली. बहीण त्याला कारण विचारत होती, मात्र जितेंद्रने काहीही उत्तर दिलं नाही. त्याने सुसाइड नोटवर आईचं नाव लिहिलं आहे. सॉरी आई, मी बिघडलोय. मला माफ कर, मला घरी येण्याची इच्छा नाही. मला घरातील परिस्थिती पाहावत नाही. मी कुठे जाऊ? असं म्हटलं आहे. 

धक्कादायक! ऑनलाईन गेमचा नाद जीवावर बेतला

"माझं कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींवर खूप प्रेम आहे. मला जास्तीच्या पैशाच्या हव्यासापोटी ऑनलाईन जुगार खेळण्याचं व्यसन लागलं आहे. मला वाटतं होतं की ऑनलाईन गेम खेळून खूप पैसे जिंकेने आणि मम्मी-पापांसाठी लवकरच नवीन घर विकत घेईन. जमीन घेण्याची देखील इच्छा होती. पण मी नाही जिंकलो, हरलो. मी माझ्या बहिणींवर खूप प्रेम करतो" असं तरुणाने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News ba student ate poison said thought winning online game would take home for parents but lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.