खळबळजनक! कॅशियरनेच बँकेच्या पैशांवर डल्ला मारला, तब्बल 41 लाख सट्ट्यात हरला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 02:02 PM2022-12-22T14:02:13+5:302022-12-22T14:12:13+5:30

अमित कुमार पांडे हा बँक ऑफ बडोदाच्या बडोदा यूपी बँक फकीराबाद शाखेत कॅशियर म्हणून कार्यरत आहे. 

Crime News bank cashier lost 41 lakhs in betting | खळबळजनक! कॅशियरनेच बँकेच्या पैशांवर डल्ला मारला, तब्बल 41 लाख सट्ट्यात हरला अन्...

खळबळजनक! कॅशियरनेच बँकेच्या पैशांवर डल्ला मारला, तब्बल 41 लाख सट्ट्यात हरला अन्...

googlenewsNext

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कौशांबी जिल्ह्यात एका कॅशियरने बँकेचे तब्बल 41 लाख रुपये सट्ट्यामध्ये गमावले आहेत. रोख रकमेची जुळवाजुळव करताना काही रक्कम कमी असल्याचं आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. बँकेच्या व्यवस्थापकाने या घोटाळ्याची माहिती क्षेत्रीय व्यवस्थापकाला दिली. अधिकाऱ्यांनी कॅशियरकडे चौकशी केली असता त्याने सट्टेबाजीत 41 लाख रुपये गमावल्याची कबुली दिली. शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कॅशियरवर गुन्हा दाखल करून त्याची कारागृहात रवानगी केली. 

अतिरिक्त पोलीस अधीक्षक समर बहादूर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराय अकील पोलीस स्टेशन हद्दीतील बँक ऑफ बडोदाच्या फकिराबाद शाखेच्या कॅशियरने 41 लाख रुपये गायब केले आहेत. आरोपींवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन हद्दीतील रसुलपूर बुरे येथील रहिवासी अमित कुमार पांडे हा बँक ऑफ बडोदाच्या बडोदा यूपी बँक फकीराबाद शाखेत कॅशियर म्हणून कार्यरत आहे. 

शाखा व्यवस्थापक कृष्णा बिहारी श्रीवास्तव यांनी सांगितले की, 19 डिसेंबर रोजी शाखेत आवश्यकतेपेक्षा जास्त रोकड होती. त्याच दिवशी मंझनपूर शाखेला मेसेजद्वारे 30 लाख काढल्याची माहिती देण्यात आली. बँकेत अधिकारी ओमप्रकाश आणि कॅशियर अमित कुमार पांडे काम करत होते. याच दरम्यान अमित कुमार पांडे यांनी फोन करून कॅश घेऊन येणारी गाडी येणार आहे पण माझ्याकडे कमी पैसे आहेत, असे सांगितले. त्यावर शाखा व्यवस्थापक कृष्ण बिहारी श्रीवास्तव यांनी 30 लाख आहेत का, अशी विचारणा केली. रोख रक्कम कशी कमी झाली. शाखा व्यवस्थापकाने ही बाब विभागीय व्यवस्थापकांना कळवली.

अमित कुमार पांडे याने सांगितले की, सुमारे 4122845 रुपये कमी आहेत. ही रक्कम त्यांनी आपल्या मुलीला दिली आहे. अधिकार्‍यांनी मुलीकडून पैसे परत मागवून घेण्याच्या सूचना दिल्या. पण तो उशीर करू लागला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. कॅशियरची कडक चौकशी केली असता त्याने बँकेच्या पैशांवर सट्टा लावल्याचे सांगितले. पण तो गेम हरला. या स्थितीत सट्टेबाजांना 41 लाख रुपये देण्यात आले.  पोलिसांनी आरोपी कॅशियरला अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Crime News bank cashier lost 41 lakhs in betting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.