"आज पृथ्वीवरील आमचा शेवटचा दिवस... गुडबाय"; प्रेमप्रकरणातून कपलने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 12:23 PM2022-07-16T12:23:27+5:302022-07-16T12:24:25+5:30
Crime news : प्रेम प्रकरणातून एका कपलने टोकाचं पाऊल उचललं आहे.
नवी दिल्ली - प्रेमात माणूस आंधळा होतो असं म्हणतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून एका कपलने टोकाचं पाऊल उचललं आहे. नालंदा जिल्ह्यातील बिहार पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळून आला. दोघांची ओळख पटली असून तरुण नवाडा येथील रहिवासी होता तर तरुणी लखीसराय येथील रहिवासी होती. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी 22 वर्षीय रॉकीने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून "आज पृथ्वीवरील आमचा शेवटचा दिवस आहे" अशी पोस्ट करत काही फोटो शेअर केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय रॉकी हा नवादा जिल्ह्यातील काशीचक पोलीस स्टेशन हद्दीतील मधेपूर गावातील रहिवासी टुन्ना महतो यांचा मुलगा होता. लखीसराय येथील 19 वर्षीय सोनम कुमारी ही त्याची गर्लफ्रेंड होती. या घटनेनंतर कुटुंबीयांना धक्का बसला आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, रॉकी आणि सोनमचे प्रेमप्रकरण अनेक दिवसांपासून सुरू होते. महिनाभरापूर्वी रॉकी सोनमसोबत आसनसोलमधून फरार झाला होता. नातेवाईकांनी समजूत काढल्यानंतर दोघेही घरी आले होते.
मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जुलै रोजी रॉकी गावातील मुलीच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी खडगपूर (बंगाल) येथे गेला होता. 6 जुलै रोजी लग्नानंतर तो साथीदारांसह तेथून निघून गेला, मात्र घरी येण्याऐवजी तो आसनसोलमध्येच राहिला. तेथे त्याने सोनमशी संपर्क साधला. आसनसोल ते पाटणा तिकीट काढले होते, मात्र पाटण्याला पोहोचण्यापूर्वी ते सोमवारी सकाळी 6 ते 7 च्या सुमारास बिहार शरीफ येथे उतरून एका हॉटेलमध्ये गेले. मंगळवारी सकाळी दोघांचे मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळून आले.
रॉकीने फेसबुकवर केली पोस्ट
सोमवारी रात्री उशिरा रॉकीने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आणि लिहिले की आज पृथ्वीवरील आपला शेवटचा दिवस आहे. आता या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. आक्रोश करून मृताची आई व कुटुंबीयांची अवस्था वाईट झाली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले. हत्या की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.