Crime News: मित्रानेच दिला दगा, पत्नीसोबत लिव्ह इनमध्ये राहिला, संतप्त पतीने असा बदला घेतला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 05:20 PM2022-06-12T17:20:49+5:302022-06-12T17:22:30+5:30

Crime News: पत्नीनं केलेली फसवणूक आणि मित्राने केलेल्या विश्वासघातामुळे संतप्त झालेल्या एका पतीने क्रूरपणे बदला घेत मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीतील सदर बाजार परिसरात घडली आहे.

Crime News: Betrayal by a friend, lived in a live-in with his wife, an angry husband took revenge | Crime News: मित्रानेच दिला दगा, पत्नीसोबत लिव्ह इनमध्ये राहिला, संतप्त पतीने असा बदला घेतला 

Crime News: मित्रानेच दिला दगा, पत्नीसोबत लिव्ह इनमध्ये राहिला, संतप्त पतीने असा बदला घेतला 

googlenewsNext

नवी दिल्ली - पत्नीनं केलेली फसवणूक आणि मित्राने केलेल्या विश्वासघातामुळे संतप्त झालेल्या एका पतीने क्रूरपणे बदला घेत मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीतील सदर बाजार परिसरात घडली आहे. दिल्ली पोलिसांनी शनिवारी रॉबिन नावाच्या एका व्यक्तीला या प्रकरणात अटक केली आहे. त्याने त्याचा २६ वर्षीय मित्र कुणाल याची हत्या केली होती. याबाबत त्याची चौकशी केली असता त्याने हत्येमागचं धक्कादायक कारण कथन केलं. मी तुरुंगात असताना कुणाल माझ्या पत्नीसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. ही बाब मला खटकली. त्यामुळे मी त्याची हत्या केली, असं त्यांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबिनने चौकशीमध्ये सांगितलं की, तो आणि कुणाल चांगले मित्र होते. काही दिवसांपूर्वी रॉबिनला एका प्रकरणात तुरुंगात जावं लागलं होतं. त्यानंतर कुणालने रॉबिनच्या पत्नीशी जवळीक वाढवली. तसेच तो तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. आपलीत सात वर्षांची मुलगीही या दोघांसोबतच राहत होती, असेही रॉबिनने सांगतले. त्यामुळे रॉबिन संतप्त झाला. तसेच तुरुंगातून बाहेर आल्यावर रॉबिनने कुणालचा काटा काढला. त्याने कुणालवर चाकूने सपासप वार केले आणि बदला घेऊन तिथून फरार झाला.

या घटनेची माहिती गुरुवारी रात्री पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस जेव्हा घटनास्थळावर पोहोचले तेव्हा कुणालला लोक रुग्णालयात घेऊन गेले होते. पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांना मृत कुणाल हा रॉबिनच्या पत्नीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता, अशी माहिती मिळाली. त्यामुळे संतापलेल्या रॉबिनने कुणालची हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी सीटीटीव्हीद्वारे त्याचा शोध सुरू केला. त्याचा मोबाईल बंद येत होता. दरम्यान, आरोपी तीस हजारी कोर्ट परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.  

Web Title: Crime News: Betrayal by a friend, lived in a live-in with his wife, an angry husband took revenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.