Crime News: घरात लपून बसला आणि चाकूने केले सपासप वार, भिवंडी मनपाच्या सफाई कर्मचारी महिलेची हत्या
By नितीन पंडित | Published: October 1, 2022 04:09 PM2022-10-01T16:09:17+5:302022-10-01T16:10:01+5:30
Crime News: भिवंडी महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या महिलेची अज्ञात इसमाने धारदार चाकूने हत्या केल्याची घटना शहरातील कणेरी परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. सविता शिवराम साळवे वय ४५ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
- नितीन पंडित
भिवंडी:दि.१- भिवंडी महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या महिलेची अज्ञात इसमाने धारदार चाकूने हत्या केल्याची घटना शहरातील कणेरी परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. सविता शिवराम साळवे वय ४५ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
हत्या करणारा आरोपी हा महिलेच्या घरातच दबा धरून लपून बसला होता.सकाळी सदर महिला काही कारणासाठी कामावरून घरी आली होती.घराचा दरवाजा उघडताच आत लपून बसलेल्या इसमाने महिलेच्या शरीरावर व गाळ्यावर धारदार चाकूने वार केले व घटनास्थळावरून पळून गेला.या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली होती.स्थानिक नागरिकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेली असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून आरोपीला अटक केल्या नंतरच हि हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली आहे याची माहिती मिळेल अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके यांनी दिली आहे.