बेरोजगारीला कंटाळून 'त्याने' फेसबुकवर लाईव्ह सुसाईड करण्याचा केला प्रयत्न पण झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 03:13 PM2021-10-22T15:13:39+5:302021-10-22T15:22:36+5:30

Crime News : बेरोजगारीमुळे एका व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Crime News bhopal man tried to commit suicide live on facebook in delhi reason is shocking | बेरोजगारीला कंटाळून 'त्याने' फेसबुकवर लाईव्ह सुसाईड करण्याचा केला प्रयत्न पण झालं असं काही...

बेरोजगारीला कंटाळून 'त्याने' फेसबुकवर लाईव्ह सुसाईड करण्याचा केला प्रयत्न पण झालं असं काही...

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनमध्ये अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. हातावरचं पोट असणाऱ्यांची अवस्था तर अत्यंत बिकट झाली. याच दरम्यान अनेकांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याच्या अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर आल्या आहेत. अशीच एक भयंकर घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. बेरोजगारीमुळे एका व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

दिल्लीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीला लॉकडाऊनमुळे आपली नोकरी गमवावी लागली. तीन वर्षांपूर्वी पत्नी सोडून गेल्याने तो घरामध्ये एकटाच राहत होता. हातात कोणतंही काम नसल्याने तरुणाची मानसिक अवस्था ठीक नव्हती. तो सतत तणावात असायचा. बेरोजगारीला कंटाळून तरुणाने फेसबुकवर लाईव्ह सुसाईड संदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलला (Delhi Police Cyber Cell) फेसबुक (Delhi Live Suicide Case) च्या माध्यमातून एक व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली. 

आत्महत्या करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी विशेष टीम

तरुणाने फेसबुकवर आत्महत्ये संदर्भातील एक पोस्ट देखील काही वेळापूर्वी पोस्ट केली होती. याची माहिती मिळताच सायबर सेलचे डिसीपी केपीएस मल्होत्रा यांनी आपल्या टीमच्या अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश दिले होते. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा तातडीने शोध घेण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आल्या. तपास आणि अधिक चौकशीदरम्यान पोलिसांना त्या तरुणाचा शोध घेण्यात यश आले आणि त्यांनी त्याच्या राहत्या घराचा पत्ता देखील शोधून काढला. 

नोकरी नसल्याने टोकाचं पाऊल उचललं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण राजोरी गार्डन परिसरात राहत होता. जेव्हा पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तो घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. सायबर सेलने त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तपासामध्ये या व्यक्तीने थायरॉईडसाठी वापरण्यात येणारं सिरप प्यायलं होतं. नोकरी नसल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती त्याने अधिकाऱ्यांना दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Read in English

Web Title: Crime News bhopal man tried to commit suicide live on facebook in delhi reason is shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.