तीन ब्रँडची दारू घेऊन जाणारा ट्रक 20 फूट दरीत उलटला, पोलीस पोहोचेपर्यंत लोकांनी केली मनसोक्त लुटालुट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 04:40 PM2021-12-29T16:40:55+5:302021-12-29T16:42:35+5:30
अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत अनेकांनी दारूची लुटालुट केली होती. यानंतर पोलिसांनी ट्रकमधून दारू काढून पोलीस ठाण्यात आणली. येथे दारूची मोजणी करण्यात आली. ही दारू झारखंडमधील तीन वेगवेगळ्या ब्रँडची असल्याचे बोलले जात आहे.
बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदीची पोल-खोल होताना दिसत आहे. जमुई-मलयपूरच्या मुख्य मार्गावर बुधवारी पहाटेच्या सुमारास अवैध दारू वाहतूक करणारा ट्रक पतनेश्वर चौकाजवळ उलटून 20 फूट खोल दरीत कोसळला. यादरम्यान दोन चालक ट्रकमधून उड्या मारून फरार झाले. तर अपघातात ट्रकची धडक बसल्याने एक वृद्ध जखमी झाला आहे.
अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत अनेकांनी दारूची लुटालुट केली होती. यानंतर पोलिसांनी ट्रकमधून दारू काढून पोलीस ठाण्यात आणली. येथे दारूची मोजणी करण्यात आली. ही दारू झारखंडमधील तीन वेगवेगळ्या ब्रँडची असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कटौना, मलयपूर मार्गे अवैध दारूची खेप जाणार असल्यासंदर्भात एसपी प्रमोद कुमार मंडल यांना गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे मलयपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कटौना बायपास वळणावर बॅरियर्स लावून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली होती. यावेळी पोलिसांनी ट्रक अडविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ट्रक बॅरियर तोडून जमुईच्या दिशेने धावू लागला. पोलिसांनी या ट्रकचा पाठलागही केला. मात्र ट्रकचा वेग अधिक असल्याने पतनेश्वर चौकातील टर्णवर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. आणि एका वृद्धाला डॉश देऊन तो लिंबाच्या झाडाला धडकून 20 फूट खोल दरीत उलटला.
दरम्यान, दारू तस्कर ट्रक मालकाचा शोध घेतला जात आहे. यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.