धक्कादायक! भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या, गेल्या 8 दिवसांत हत्येच्या 7 घटनांनी खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 04:24 PM2021-04-03T16:24:59+5:302021-04-03T16:28:48+5:30
BJP Brijesh Singh Murder : गेल्या आठ दिवसांत हत्येच्या तब्बल सात घटना घडल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोरखपूर - उत्तर प्रदेशमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 8 दिवसांत तब्बल हत्येच्या 7 घटना घडल्या आहेत. गोरखपूरमधील भाजपचे नेते आणि ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले माजी सरपंच बृजेश सिंह (BJP Brijesh Singh) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गेल्या आठ दिवसांत हत्येच्या तब्बल सात घटना घडल्याने गोरखपूरमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्य़ा माहितीनुसार, गुलरिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपूर गावातील बृजेश सिंह यांची शुक्रवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली. ते निवडणूक प्रचार करून आपल्या गावातून गोरखपूरला परत जात होते.
भयंकर! पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला अन् सर्वांना धक्काच बसला...https://t.co/dFzAGNZzY9#crime#crimesnews#Police
— Lokmat (@MiLOKMAT) April 1, 2021
बृजेश सिंह हे गावाचे माजी सरपंच आणि भाजपचे सेक्टर प्रभारी होते. गावात प्रचार उरकून रात्री 11 वाजता ते गोरखपूर शहरातील आपल्या निवासस्थानी जात होते. त्याचदरम्यान गावाबाहेरच दबा धरून बसलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती मिळताच खळबळ निर्माण झाली. घटनास्थळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक आणि. कुटुंबीयही दाखल झाले. उपचारांसाठी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अबब! आयकर विभागाची मोठी कारवाई; कोट्य़वधीच्या रक्कमेसह 1 कोटी 93 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त, नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोपhttps://t.co/Nn0OrErmcb#IncomeTax#IncomeTaxRaid#crime#money
— Lokmat (@MiLOKMAT) April 1, 2021
दोन दिवसांपूर्वीच जमिनीवरून प्रॉपर्टी डीलरसोबत वाद झाला होता. त्यामुळे त्या दिशेनेही तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुनील श्रीवास्तव आणि रामसमुझ या दोघांना अटक केली आहे. तर अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे. गोरखपूरमध्ये गेल्या आठ दिवसांत सात हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गोरखपूरमध्ये भीतीचे वातावरण आहे. गोरखपूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही हत्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मोठी दुर्घटना टळली! अर्धी ट्रेन जवळपास एक किलोमीटर पुढे निघून गेली... प्रवाशांमध्ये एकच गोंधळhttps://t.co/kY91RZVLNx#IndianRailways#TRAIN
— Lokmat (@MiLOKMAT) April 3, 2021