Crime News: आसाराम बापूच्या आश्रमात कारमध्ये मिळाला तरुणीचा मृतदेह, चार दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 10:57 IST2022-04-08T10:56:00+5:302022-04-08T10:57:20+5:30
Crime News: उत्तर प्रदेशमधील गोंडा येथील आसाराम बापूच्या आश्रमामध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही बातमी समजल्यावर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता.

Crime News: आसाराम बापूच्या आश्रमात कारमध्ये मिळाला तरुणीचा मृतदेह, चार दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता
लखनौ - उत्तर प्रदेशमधील गोंडा येथील आसाराम बापूच्या आश्रमामध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही बातमी समजल्यावर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, आश्रमात मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही तरुणी तिच्या घरामधून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह आसाराम बापूच्या आश्रमात अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या एका कारमध्ये सापडला. कारमधून दुर्गंधी येऊ लागल्याने कर्मचाऱ्यांनी कार उघडून पाहिले, तेव्हा त्यांना आत एका तरुणीचा मृतदेह दिसला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
त्यानंतर घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी आश्रम सील केला आणि पुढील तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये हे प्रकरण हत्या करून मृतदेह लपवण्याचे दिसत आहे. ही घटना बिमौर गावातील आसाराम बापूच्या आश्रमात घडली आहे. तिथे ही कार गेल्या अनेक दिवसांपासून उभी होती.
पोलिसांनी सांगितले की, कारमधून दुर्गंधी आल्यानंतर आश्रमातील वॉचमनने कार उघडून पाहिली. त्यावेळी आतमध्ये एक मृतदेह दिसला. त्यानंतर त्याने याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळावर आलेल्या पोलिसांनी कार आणि आश्रमाला सील केले. तसेच मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. आता पोलीस आणि फॉरेंसिक टीम आश्रम आणि गाडीचा तपास करत आहेत.