Crime News: रेशनकार्डासाठी घेतली लाच, पुरवठा शाखेतील खासगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 09:33 PM2022-05-19T21:33:45+5:302022-05-19T21:34:25+5:30

Crime News: रेशनकार्डाची दुय्यम प्रत तयार करुन देण्यासाठी महिलेकडून ४०० रुपयांची लाच स्विकारताना जळगाव तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेचा पंटर पराग पुरुषोत्तम सोनवणे (वय ३९, रा.खोटे नगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले.

Crime News: Bribe taken for ration card, private punter in supply branch in ACB's net | Crime News: रेशनकार्डासाठी घेतली लाच, पुरवठा शाखेतील खासगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

Crime News: रेशनकार्डासाठी घेतली लाच, पुरवठा शाखेतील खासगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

googlenewsNext

जळगाव -  रेशनकार्डाची दुय्यम प्रत तयार करुन देण्यासाठी महिलेकडून ४०० रुपयांची लाच स्विकारताना जळगाव तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेचा पंटर पराग पुरुषोत्तम सोनवणे (वय ३९, रा.खोटे नगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. पराग याला अटक करण्यात आली असून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचे रेशनकार्ड जुने व जीर्ण झालेले असल्याने ते रेशनकार्डची दुय्यम नविन प्रत मिळण्यासाठी जळगाव तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत जळगाव येथे अर्ज घेऊन गेले असता तेथे बसलेला खासगी पंटर पराग याने हे काम करुन देण्यासाठी चारशे रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर गुरुवारी पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव ,संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर,मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनील शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी,नासिर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदीप पोळ यांच्या पथकाने पुरवठा विभागात सापळा रचला. ४०० रुपये स्विकारताना पराग याला रंगेहाथ पकडण्यात आले.  

Web Title: Crime News: Bribe taken for ration card, private punter in supply branch in ACB's net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.