Crime News: अनैतिक संबंधाच्या वादातून मामेभावाचा खून, ट्रकमध्येच धारधार वस्तूने डोक्यावर केला जबर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 05:53 PM2022-12-27T17:53:28+5:302022-12-27T17:54:32+5:30

Crime News: अनैतिक संबंधाच्या मुद्यावरून वाद निर्माण होत त्याचे परिर्वतन भांडणात झाल्यानंतर ३५ वर्षीय कन्हयालाल यादव नामक ट्रक चालकाने त्याच्या मामे भावाच्या डोक्यावर धारधार वस्तूने हल्ला करून त्याचा खून केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.

Crime News: Brother-in-law killed due to immoral relationship dispute, assaulted on head with sharp object in truck | Crime News: अनैतिक संबंधाच्या वादातून मामेभावाचा खून, ट्रकमध्येच धारधार वस्तूने डोक्यावर केला जबर हल्ला

Crime News: अनैतिक संबंधाच्या वादातून मामेभावाचा खून, ट्रकमध्येच धारधार वस्तूने डोक्यावर केला जबर हल्ला

googlenewsNext

वास्को: अनैतिक संबंधाच्या मुद्यावरून वाद निर्माण होत त्याचे परिर्वतन भांडणात झाल्यानंतर ३५ वर्षीय कन्हयालाल यादव नामक ट्रक चालकाने त्याच्या मामे भावाच्या डोक्यावर धारधार वस्तूने हल्ला करून त्याचा खून केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२७) सकाळी उघडकीस आला. कन्हयालाल यांने त्याचा ३५ वर्षीय मामे भाऊ संजय यादव याचा खून करून मृतदेह साकवाळ येथील ‘मेटास्ट्रीप’ कंपनीच्या जवळील अज्ञात स्थळावर फेकलेल्या सिमेंट - कोंक्रीट ढीगाºयाखाली लपवून ठेवला होता. मंगळवारी सकाळी वेर्णा पोलीसांना खूनाची माहीती मिळताच काही तासातच त्यांनी खूनाचा छडा लावून संजयचा खून केलेला संशयित कन्हयालालच्या मुसक्या आवळल्या.

मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ‘मेटास्ट्रीप’ कंपनीच्या समोरील एका अज्ञात स्थळावर सिमेंट - कोंक्रीट ढीगाºयाखाली एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहीती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन तपासाला सुरवात केली असता तो मृतदेह झरींत, झुआरीनगर येथे राहणाºया ३५ वर्षीय संजय यादव याचा असल्याचे उघड झाले. संजय मूळ उत्तरप्रदेश येथील असून तो येथे एका ठीकाणी कामगार म्हणून काम करायचा. झारींत, झुआरीनगर येथे तो त्याच्या पत्नी आणि मुलासहीत रहायचा. पोलीसांनी मृतदेहाची पाहणी केली असता संजयच्या डोक्यावर धारधार वस्तूने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. चौकशीवेळी सोमवारी (दि.२६) रात्री संजय आणि त्याचा आते भाऊ एकत्रीत होते असे पोलीसांना समजले. संजयचा आते भाऊ कन्हयालाल ट्रक चालक असून तो सावर्डे येथे असल्याचे कळताच पोलीसांचे एक पथक त्वरित तेथे पोचून ते त्याला चौकशीसाठी घेऊन घटनास्थळावर आले. चौकशी करताना कन्हयालाल याच्यावर पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांनी त्याची कसून चौकशी करायला सुरवात केली असता अखेरीस कन्हयालाल यांनी आपणच संजयचा खून केल्याची कबूली पोलीसांसमोर दिली.

सोमवारी रात्री झरींत, झुआरीनगर येथे कन्हयालाल घेऊन आलेल्या ट्रकात संजय आणि कन्हयालाल यांच्यात एका अनैतिक संबंधाच्या विषयावरून वाद निर्माण झाला. वादाचे परिर्वतन नंतर भांडणात होऊन कन्हयालाल यांनी ट्रकातच असलेल्या एका धारधार वस्तूने संजयच्या डोक्यावर जबर हल्ला केला. त्या हल्यामुळे संजय गंभीररित्या जखमी झाल्यानंतर कन्हयालाल त्याला ट्रकातच घेऊन ‘मेटास्ट्रीप’ कंपनीच्या जवळ असलेल्या त्या अज्ञात स्थळावर आला. मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास कन्हयालाल यांने संजयला त्या अज्ञात स्थळावर टाकलेल्या सिमेंट - कोंक्रीट ढीगाºयाखाली लपवून नंतर तो तेथून निघून गेला असे पोलीसांना चौकशीत उघड झाले. जेव्हा कन्हयालाल यांने संजयला ढीगाºयाखाली लपविला त्यावेळी तो जिवंत होता की त्याचा मृत्यू झाला होता ते संजयच्या मृतदेहावर शवचिकीत्सा झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी सांगितले. कन्हयालाल हा मूळ उत्तरप्रदेश येथील असून तो कोळसा मालाची वाहतूक करणाºया ट्रकचा चालक आहे. सोमवारी त्यांनी मुरगाव बंदरातून कोळसा माल भरल्यानंतर तो माल त्यांने सावर्डे येथे एका ठीकाणी खाली केला असे पोलीसांना चौकशीत समजले आहे. त्यानंतर तो ट्रक घेऊन झरींत, झुआरीनगर येथे संजयच्या घरी आला. त्यानंतर संजय कन्हयालाल याला भेटल्यानंतर दोघेहीजण ट्रकमध्ये बसून चर्चा करताना त्यांच्यात एका अनैतिक संबंधांच्या विषयावरून वाद निर्माण झाल्यानंतर खूनाची घटना घडल्याचे पोलीसांना चौकशीत समजले आहे. ट्रक चालक कन्हयालाल अनेकवेळा त्याचा मामेभाऊ संजय याच्या झरींत, झुआरीनगर येथे घरी यायचा असे पोलीसांना चौकशीत समजले आहे. ३५ वर्षीय संजयचा कन्हयालाल यांने खून केल्याचे पोलीसांना चौकशीत समजल्यानंतर त्यांनी त्वरित कारवाई करून त्याला अटक केली. संजयच्या डोक्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेली धारधार वस्तू पोलीसांना आढळलेली नसून संजयच्या खूनासाठी वापरलेल्या त्या वस्तूचा पोलीस शोध घेत आहेत. वेर्णा पोलीस निरीक्षक डायगो ग्राशियस यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या खूनाचा अधिक तपास चालू आहे.

खूनी ट्रकमध्ये भरत होता माल
मंगळवारी सकाळी वेर्णा पोलीसांना खूनाची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन चौकशीला सुरवात केली. खून झालेल्या संजयबरोबर रात्री त्याचा आत्येभाऊ कन्हयालाल होता असे पोलीसांना चौकशीत कळाल्यानंतर त्याला चौकशीसाठी आणण्याकरिता ते त्याचा शोध घ्यायला लागले. कन्हयालाल सावर्डे येथे असल्याचे कळताच पोलीसांच्या एका पथकाने तेथे धाव घेतली. यावेळी कन्हयालाल ट्रकमध्ये माल भरत होता असे पोलीसांना दिसून आल्याची माहीती सूत्रांनी दिली. पोलीस नंतर त्याला घेऊन संजयचा मृतदेह टाकलेल्या ठीकाणी घेऊन आले. त्यानंतर चौकशीवेळी त्यांने खूनाची कबूली दिली असे सूत्रांनी सांगितले. पोलीसांनी वेळेवरच कारवाई करून कन्हयालाल याला ताब्यात घेतल्याने काही तासातच ह्या खूनाचा छडा लागून आरोपी गजाआड झाला. कदाचित पोलीसांना उशिर झाला असता तर आरोपीला पसार होण्यास मदत मिळाली असती असे सूत्रांनी बोलताना सांगितले.

पत्नीने पटवली मृतदेहाची ओळख
मृतदेह आढळलेल्या ठीकाणी पोलीसांनी पोचून चौकशीला सुरवात केली असता तो मृतदेह संजय यादव याचा असल्याची माहीती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलीसांनी संजयच्या पत्नीला घटनास्थळावर बोलवून तिला मृतदेह दाखविला असता तो मृतदेह संजयचा असल्याचे तिने निश्चित केले अशी माहीती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली.
 

Web Title: Crime News: Brother-in-law killed due to immoral relationship dispute, assaulted on head with sharp object in truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.