Crime News: बांग्लादेशातून भारतात आले अन् चोऱ्या सुरू केल्या; एका महीन्यात टाकले 20 पेक्षा जास्त दरोडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 08:36 PM2022-09-15T20:36:48+5:302022-09-15T20:58:45+5:30
Crime News: पोलिसांनी बांग्लादेशी दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे, टोळीतील एकावर 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
Crime News:दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये बंद घरांचे दरवाजे उचकटून दरोडे टाकणाऱ्या बांगलादेशी टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दिल्ली-एनसीआरमधील रेल्वे लाईनच्या आजूबाजूला असलेल्या वसाहतींमध्ये रेकी करायचे आणि दरोडा टाकायचे. या आरोपींनी गेल्या महिनाभरात बापूधाम, मधुबन, कवी नगर, मसुरी लोणी भागात 20 हून अधिक दरोडे टाकले.
पोलिसांनी चोरट्यांच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख 1.25 लाख रुपये आणि कुलूप तोडण्याची साधने जप्त केली आहेत. या टोळीत दोन सराफांचाही समावेश असून, ते फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. सराफ हे चोरट्यांकडून लुटीच्या वस्तू खरेदी करायचे. या टोळीने एकाच रात्री तीन चोरीच्या घटना घडवल्याचे समोर आले आहे.
टोळीचा म्होरक्या मुगलशेर
मुगल शेर, आफताब, करीम आणि मुरसलीन अशी या आरोपींची नावे आहेत. मुगलशेर हा या टोळीचा म्होरक्या आहे. रात्री चालण्याचा आवाज येऊ नये, म्हणून हे अनवाणी पायाने चोरी करायचे. या टोळीने राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात चोरी व दरोड्याच्या घटना घडवून आणल्या आहेत. याप्रकरणी गाझियाबाद पोलीस, फिरोज आणि राजाराम या दोन सराफांचाही शोध घेत आहेत.
मुघलशेर मोठा गुन्हेगार
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या टोळीचा मुख्य सूत्रधार मुघलशेर हा मोठा गुन्हेगार आहे. त्याच्यावर राजस्थान, गाझियाबाद, दिल्ली येथे 40 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आफताबविरुद्ध 25, करीमविरुद्ध 19 आणि मुरसलीनविरुद्ध 17 गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील सदस्य मूळचे बांगलादेशचे आहेत. ते अनेक वर्षांपूर्वी दिल्लीत स्थायिक झाले होते.