crime News: महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या, गावातील शिक्षकाला अटक, धक्कादायक कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 11:50 PM2022-01-28T23:50:40+5:302022-01-28T23:51:34+5:30
crime News: अर्जुनवाडा ता. कागल येथील एका महाविद्यालयीन युवतीला त्याच गावातील एका शिक्षकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न करण्याचा तगादा लावला होता.गेल्या महिना दीड महिना पासून हा शिक्षक त्रास देत होता या त्रासाला कंटाळून सदरच्या युवतीने विष प्राशन करून आत्महत्या केली.
कोल्हापूर - अर्जुनवाडा ता. कागल येथील एका महाविद्यालयीन युवतीला त्याच गावातील एका शिक्षकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न करण्याचा तगादा लावला होता.गेल्या महिना दीड महिना पासून हा शिक्षक त्रास देत होता या त्रासाला कंटाळून सदरच्या युवतीने विष प्राशन करून आत्महत्या केली.आकांक्षा तानाजी सातवेकर (वय १९)असे मयत युवती चे नाव आहे.तर मुरगूड पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला आज अटक केली आहे.
अधिक माहिती अशी अर्जुनवाडा येथील रहिवाशी पण मुगळी ता.कागल येथील एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणारा अमित भीमराव कुंभार हा आपल्या गावातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा हिला फोन करून तर कधी सोशल मीडिया च्या माध्यमातून नेहमी त्रास देत होता.गेल्या महिना दीड महिन्यापासून तो वेगवेगळे संदेश ही पाठवायचा.लग्नासाठी होकार दिलासा तर मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या बरोबर लग्न करण्यास तयार होईन हा आणि असेच संदेश तो पाठवत होता.
२२ जानेवारी रोजी आकांक्षा ने या त्रासाला कंटाळून आपल्या राहत्या घरीच विष प्राशन केले.तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.तिच्यावर शर्तीचे उपचार सुरू होते. २७ जानेवारी ला आकांक्षा ने मी अमित कुंभार यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केल्याचा जबाब वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या समोर दिला होता.दरम्यान उपचार सुरू असतानाच आज दुपारी आकांक्षा चा मृत्यू झाला.
मुरगूड पोलिसांनी आकांक्षा ने दिलेल्या जबाबा नुसार कालच सदर शिक्षक अमित कुंभार याला गुरुवारी ताब्यात घेतले होते.आणि आज सांयकाळी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.याबाबतची फिर्याद युवतीचे वडील तानाजी हरी सातवेकर यांनी मुरगूड पोलिसात दिली.अधिक तपास सपोनि विकास बडवे करत आहेत.