Crime News: नॉयलॉन मांजा विकणाऱ्या दुकानदाराविरुद्ध गुन्हा, चाळीसगाव येथे धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 21:52 IST2023-01-14T21:50:26+5:302023-01-14T21:52:21+5:30
Crime News: पतंगासाठी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News: नॉयलॉन मांजा विकणाऱ्या दुकानदाराविरुद्ध गुन्हा, चाळीसगाव येथे धडक कारवाई
- संजय सोनार
जळगाव : पतंगासाठी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील शांताराम अमृतकार (४७ रा. शास्त्रीनगर ,चाळीसगाव) असे या गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. घाटरोडवर समर्थ जनरल स्टोअर्स या दुकानात तो नायलॉन मांजासह १८६ चक्री असलेला १ हजार ६९२ रुपये किंमतीचा माल चोरट्या मार्गाने विक्री करतांना आढळून आला. दुकानदाराविरुद्ध भादंवि कलम १८३, ३३६ सहित,पर्यावरण संरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायलॉन मांजा विक्री करतांना किंवा बाळगतांना आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, इशारा पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी दिला आहे.