Crime News: मीरारोडच्या ऑर्केस्ट्रा बारच्या धाडीत ३२ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 03:33 PM2022-06-29T15:33:01+5:302022-06-29T15:33:29+5:30
Crime News: मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंप लगत असलेल्या गंधर्व ह्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये ऑर्केस्ट्राच्या आड अश्लील नाच चालत असल्याचे नया नगर पोलिसांच्या धाडीत उघडकीस आले असून बारबालांसह ग्राहक , बार कर्मचारी असे ३२ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मीरारोड - मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंप लगत असलेल्या गंधर्व ह्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये ऑर्केस्ट्राच्या आड अश्लील नाच चालत असल्याचे नया नगर पोलिसांच्या धाडीत उघडकीस आले असून बारबालांसह ग्राहक , बार कर्मचारी असे ३२ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना सदर ऑर्केस्ट्रा बार मध्ये बारबाला ह्या ग्राहक पुरुषांशी लगट करून अश्लील व बीभत्स नाच करत असल्याची माहिती मिळाली . त्यांनी पोलीस पथकास कारवाई साठी पाठवल्यावर २७ जूनच्या रात्री ११ च्या सुमारास पोलीस पथकाने गंधर्व बार वर छापा टाकला . बार मधून अश्लील नाच करणाऱ्या ४ बारबालां सह बार मधील १२ ग्राहक , बारचे १६ कर्मचारी असे एकूण ३२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
बार मधून १२ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे . जप्त रोकड मधील नोटा ह्या २० रुपयांच्या असून बारबालां वर उधळण्यासाठी त्या वापरल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले . सदर बार वर ह्या आधी देखील अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे . शहरातील ऑर्केस्ट्रा बार च्या आड सर्रास अश्लील नाच सुरु असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे .