Crime News: धक्कादायक! "बाबा माझ्या मृत्यूचा बदला अवश्य घ्या’’, सुसाईड नोट लिहून मुलीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 11:05 AM2021-08-26T11:05:32+5:302021-08-26T11:06:15+5:30
Crime News: एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या करताना लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमुळे शासन आणि प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या करताना लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमुळे शासन आणि प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. (Crime News)या मुलीने राहत्या घरातील एका खोलीत साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, या तरुणीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, माझ्या मृत्यूला रुस्तम जबाबदार आहे. त्याने माझ्यासोबत खूप वाईट काम केले आहे. बाबा तुम्ही माझ्या मृत्यूच्या बदला त्याच्याकडून अवश्य घ्या’’, ("Daddy must avenge my death", the girl committed suicide by writing a Suicide note)
दरम्यान, या आत्महत्येच्या घटनेनंतर या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात सहभाग असलेल्या दोन जणांना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी असलेला रुस्तम अद्याप पोलिसांच्या हाताबाहेर आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस जोरदार शोधमोहीम राबवत आहेत. मात्र तो पोलिसांना हुलकावणी देत आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जौनपूर जिल्ह्यातील सुरेरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीला काही तरुण त्रास देत होते. त्यामुळे ही मुलगी खूप त्रस्त होती. दरम्यान, ही मुलगी रात्री झोपण्यासाठी खोलीत गेली. मात्र सकाळी खूप उशिरापर्यंत खोलीतून बाहेर आली नाही. तेव्हा आईने दरवाजा उघडला असता तिला धक्काच बसला. या मुलीने पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास बनवून आत्महत्या केली होती.
त्यानंतर आईने केलेला आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले. दरम्यान, कुटुंबीयांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये तिने तिच्या मृत्यूसाठी रुस्तमला जबाबदार धरले होते. त्याने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप मृत मुलीने या सुसाईड नोटमधून केला होता. तसेच बाब माझ्या मृत्यूचा बदला घ्या, असी विनंतीही केली होती.
याबाबत पोलीस अधीक्षक ग्रामीण त्रिभुवन सिंह यांनी सांगितले की, मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन व्यक्तींविरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. तरुणीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. तसेच दाखल गुन्ह्यान्वये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाती मृख्य आरोपी रुस्तमचा शोध सुरू आहे.