Crime News: घातक हल्ला, खंडणी उकळणाऱ्या तरुणाची येरवडा तुरुंगात रवानगी, एपीपीडीए कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 02:53 PM2022-09-14T14:53:57+5:302022-09-14T14:57:42+5:30

Crime News: दहशत पसरवून प्राणघातक हल्ला करणे, खंडणी उकळणे, महिलांची छेडछाड अशा गंभीर गुन्ह्यावरुन तडीपारीचा आदेश बजावूनही मुक्त संचार करणाऱ्या विपूल शिंदे या तरुणावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली

Crime News: Deadly attack, extortionist sent to Yerwada jail, APPDA action | Crime News: घातक हल्ला, खंडणी उकळणाऱ्या तरुणाची येरवडा तुरुंगात रवानगी, एपीपीडीए कारवाई

Crime News: घातक हल्ला, खंडणी उकळणाऱ्या तरुणाची येरवडा तुरुंगात रवानगी, एपीपीडीए कारवाई

Next

- विपूल शिंदे
सोलापूर : शहरवासीयांमध्ये दहशत पसरवून प्राणघातक हल्ला करणे, खंडणी उकळणे, महिलांची छेडछाड अशा गंभीर गुन्ह्यावरुन तडीपारीचा आदेश बजावूनही मुक्त संचार करणाऱ्या विपूल शिंदे या तरुणावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी बुधवारी ही कारवाई केली. त्यानुसार त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली.

फौजचार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील नवी पेठ, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, नवीवेस, शिंदे चौक, चौपाड आदी परिसरात विपूल शिंदे बेकायदेशीर जमाव जमवून प्राणघातक हल्ला करुन खंडणी उकळण्याचे काम करायचा. महिलांच्या विनयभंगाचा प्रकार केला जायचा. त्याच्याविरुद्ध अशा प्रकारचे ७ गुन्हे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंद आहेत. त्याच्या या कृत्याबद्दल तो यापासून परावृत्त व्हावा म्हणून सन २०२१ मध्ये कलम ११० (ई)(ग) फौजदारी प्रक्रिया संहिता अधिनियम आणि कलम ५६ (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार सोलापूर, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करुन नये म्हणून तडीपारीचा आदेश बजावला होता.

या आदेशाचा भंग करुन पुन्हा त्याने गुन्हेगारी कृत्य केल्याने पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी एमपीएडी अधिनिमयानुसार कारवाईचे आदेश बजावले. येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली.

वर्षातील आठवणी कारवाई
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी दहशत पसरवणाऱ्या मंडळींविरुद्ध कारवाईचे अस्त्र उगारले आहे. त्यानुसार वर्षातील ही ८ वी कारवाई आहे. पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी पदभार स्वीकारल्यापासून ही चौथी कारवाई आहे.

हिट लिस्ट तयार आता कोण रडारवर
शहरात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. पुढचा गुन्हेगार कोण याबद्दल शहरात चर्चा सुरु आहे. चालू वर्षात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एपपीडीए ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: Crime News: Deadly attack, extortionist sent to Yerwada jail, APPDA action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.