Crime News: चालत्या गाडीत दोन तरुणींसोबत मौजमजा करत होता उपप्रमुखाचा पती; पोलिसांनी स्कॉर्पिओ थांबविताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 12:22 PM2023-01-16T12:22:18+5:302023-01-16T12:24:49+5:30
पोलीस रविवारी रात्री एसएच 73 मेन रोड अमनौर सोनहो मार्गादरम्यान वाहनाची तपासणी करत होते. गस्तीदरम्यान पोलिसांनी दोन संशयित तरुणांना संशयाच्या आधारे ताब्यात घेतले.
बिहारच्या छपरामध्ये पोलिसांना एका कारमध्ये दोन व्यक्तींना तरुणींसोबत विचित्र अवस्थेत पकडले आहे. या कारमध्ये पोलिसांना शस्त्रास्त्रे देखील सापडली आहेत. अटक केलेल्या तरुणाची ओळख सिवान जिल्ह्यातील बडहरियाच्या उपप्रमुख महिलेचा पती म्हणून झाली आहे. मिनहाज आलम असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे दोन पिस्तूल आणि गोळ्यांसह एक पुंगळीही सापडली आहे. त्याच्यावर आधीपासून गुन्हे नोंद आहेत.
पोलीस रविवारी रात्री एसएच 73 मेन रोड अमनौर सोनहो मार्गादरम्यान वाहनाची तपासणी करत होते. गस्तीदरम्यान पोलिसांनी दोन संशयित तरुणांना संशयाच्या आधारे ताब्यात घेतले. दोन्ही तरुणांना पोलीस ठाण्यात आणून पोलीस चौकशी करत आहेत. हे दोघे पाटण्याहून कारने सिवानकडे जात होते. स्कॉर्पिओ कारमध्ये दोन मुलीही होत्या, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेण्यात आलेला एक तरुण हा मो जाहिद बधरियाचा मुख्य प्रतिनिधी असून दुसरा उपप्रमुख मिन्हाज आलमचा पती असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन मुली असून त्यापैकी एक सिवानच्या गोरिया कोठी येथील असून दुसरी बिहपूर पोलिस ठाणे हद्दीतील आहे. मिन्हाज आलम हा बधरिया पोलीस ठाण्यातील 432/22 मधील अपहरण आणि खंडणी प्रकरणात नामांकित आरोपी असून, दोघेही मोठे गुन्हेगार आहेत.