Crime News: तब्बल साडे सात कोटींचे हिरे गायब, तक्रार दाखल, तपास सुरू, मग समोर आली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 04:55 PM2022-04-25T16:55:12+5:302022-04-25T16:56:28+5:30
Crime News: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये साडे सात कोटी रुपयांच्या हिऱ्यांची चोरी झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. ज्या हिऱ्यांची चोरी झाली ते दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद येथून आले होते. तसेच ते जयपूरच्या जवाहिऱ्यांकडे पाठवण्यात येणार होते.
जयपूर - राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये साडे सात कोटी रुपयांच्या हिऱ्यांची चोरी झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. ज्या हिऱ्यांची चोरी झाली ते दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद येथून आले होते. तसेच ते जयपूरच्या जवाहिऱ्यांकडे पाठवण्यात येणार होते.
आता या प्रकरणात मालाची डिलिव्हरी करणाऱ्या लॉजिस्टिक कंपनीच्या मॅनेजरने तक्रार दिली आहे. ज्या हिऱ्यांची चोरी झाली आहे. त्यांची बाजारातील किंमत ही सुमारे सात कोटी ५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
हा माल जयपूरमध्ये तीन ते चार राज्यांमधून सप्लाय करण्यात आला होता. हिऱ्याचा माल डिलिव्हरी करणाऱ्या लॉजिस्टिक कंपनीच्या माध्यमातून जयपूरमध्ये पोहोचला होता. मात्र जवाहिऱ्यांकडे हा माल पोहोचण्यापूर्वीच त्याची चोरी झाली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विकास, हरिओम, देव नारायण आणि सुरेंद्र कुमार यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हे सर्व आरोपी फरार आहेत. त्यांचा फोनही बंद लागत आहे. आता सिंधी कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या चोरीबाबत सिंधी कॅम्प पोलिसांनी सांगितले की, हाथी बाबू का मार्ग क्षेत्रामध्ये लॉजिस्टिक कंपनीचं कार्यालय आहे. तक्रार दाखल करणारे कंपनीचे व्यवस्थापक उत्तर प्रदेशचे आहेत. तर चारही आरोपी हे सवाई माधोपूर येथील आहे.