Crime News: अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या डॉक्टरला अटक, पॉक्सो अंतर्गत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 16:29 IST2022-08-18T16:29:04+5:302022-08-18T16:29:59+5:30
Crime News: वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी ॲक्युप्रेशर व नॅचरोपॅथी तज्ज्ञ डॉक्टरने अश्लिल चाळे करण्याचा प्रकार तुमसर येथील विनोबानगरात उघडकीस आली.

Crime News: अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या डॉक्टरला अटक, पॉक्सो अंतर्गत गुन्हा
भंडारा - वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी ॲक्युप्रेशर व नॅचरोपॅथी तज्ज्ञ डॉक्टरने अश्लिल चाळे करण्याचा प्रकार तुमसर येथील विनोबानगरात उघडकीस आली. तुमसर पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी तक्रार दिल्यानंतर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून अटक केली. त्याची रवानगी भंडारा कारगृहात करण्यात आली आहे.
विजय भैय्यालाल डहाळे (४५) रा. विनोबानगर तुमसर असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे. त्याचे विनोबानगरात ॲक्युप्रेशर व नॅचरोपॅथी दवाखाना आहे. शालेय कवायती आणि धावण्याच्या सरावाने अल्पवयीन मुलगी कंबर आणि पायाच्या दुखण्याने त्रस्त होती. ती १३ ऑगस्ट रोजी उपचारासाठी डॉ. विजय डहाळे यांच्याकडे गेली होती. तपासणी कराताना डॉक्टरने अश्लील चाळे केले. या प्रकाराची माहिती मुलीने कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी तुमसर ठाण्यात तक्रार देण्यात आली.
पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी तपास करून डॉक्टरविरुद्ध भादंविच्या कालमांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. तात्काळ डॉक्टरला अटक करण्यात आली. गुरूवारी डॉक्टरला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक रूपेश कुंभरे करीत आहेत.