Crime News: प्रेमप्रकरण बेतले जीवावर, महिलेसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरची बेदम मारहाण करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 11:46 AM2021-08-31T11:46:15+5:302021-08-31T11:55:32+5:30
Crime News: समोर येत असलेल्या माहितीनुसार डॉक्टर मनोज पंडित याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. त्याचा एक फोटो व्हायरल झाला होता.
पाटणा - बिहारमधील जमुई जिल्ह्यातील गिद्धौर पोलीस ठाण्यातील सेवा गावामध्ये प्रेमप्रकरणातून एका डॉक्टरची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मनोज पंडित असे ४० वर्षीय मृत डॉक्टरचे नाव आहे. (Crime News) मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा मनोज पंडित या डॉक्टरला काही लोकांनी पकडले आणि त्याला बेदमर मारहाण केली. या मारहाणीत मनोज पंडितचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेच्या मागे प्रेमप्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. या हत्येनंतर मृताचे नातेवाईक पोलिसांकडे आरोपींना अटक करण्याची विनंती करत आहेत. ( Doctor beaten to death after love affair with woman & photo goes viral)
समोर येत असलेल्या माहितीनुसार डॉक्टर मनोज पंडित याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. त्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोच्या आधारावरच गावातील काही लोकांनी आणि सदर महिलेच्या कुटुंबीयांनी मनोज पंडित याला पकडून बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. सदर डॉक्टर महिलेच्या घरी उपचारांसाठी गेला असताना त्यांच्यातील प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली होती.
या हत्येचा आऱोप गावातील गौतम रविदास आणि किशव रविदास यांच्या कुटुंबांसह दोन डझन लोकांवर ठेवण्यात आला आहे. मृताचा भाऊ कृष्ण रंजन कुमार याने सांगितले की, त्याचा मोठा भाऊ डॉक्टर होता. जर कुणाच्या घरी उपचारांसाठी गेल्यावर कुठल्याही महिलेसोबत प्रेम झाले आणि त्यांचा एकत्र फोटो व्हायरल झाला, तर त्यामध्ये केवळ माझा भाऊ एकटा दोषी नाही. तर संबंधित महिलाही तेवढीच दोषी आहे. मात्र या लोकांनी माझ्या भावाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. प्रेमप्रकरण किंवा व्हायरल फोटोची तक्रार पोलिसांकडे केली पाहिजे होती.
या प्रकरणी एसडीपीओ डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले की, गिद्धौरमधील सेवा गावामध्ये एका डॉक्टरची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या डॉक्टरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या अर्जावरून गुन्हा दाखल करत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडले जाणार नाही.