धक्कादायक! उपचारादरम्यान पत्नीने जीव गमावला; संतप्त पतीने थेट डॉक्टरवरच गोळीबार केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 05:23 PM2022-01-02T17:23:53+5:302022-01-02T17:29:27+5:30

Crime News : डॉक्टरवर गोळ्या झाडणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Crime News doctor firing case police arrested accused bijnor uttar prardesh | धक्कादायक! उपचारादरम्यान पत्नीने जीव गमावला; संतप्त पतीने थेट डॉक्टरवरच गोळीबार केला अन्...

धक्कादायक! उपचारादरम्यान पत्नीने जीव गमावला; संतप्त पतीने थेट डॉक्टरवरच गोळीबार केला अन्...

Next

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला म्हणून संतप्त झालेल्या पतीने डॉक्टरवर गोळीबार केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. डॉक्टरवर गोळ्या झाडणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरला उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर बाईकने जात असताना आरोपीने त्यांच्यावर गोळी झाडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सलमान आणि त्याचा साथीदार मेहबूब यांना अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून आरोपींवर 15 हजार रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते. पीडित डॉक्टर बोगस असल्याचा आरोप केला जात आहे.आरोपी सलमानने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या पत्नीवर डॉक्टर उपचार करत होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळेच संधी साधून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने डॉक्टरवर हल्ला केला. हे प्रकरण नांगल पोलीस ठाण्याच्या शेखुपुरा गावातील आहे. 30 डिसेंबर रोजी डॉक्टरांवर हल्ला झाला होता.

पोलिस अधीक्षक डॉ. धरमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबर रोजी संध्याकाळी दोन तरुणांनी नांगल पोलीस स्टेशनच्या शेखुपुरा गावातील फार्मासिस्ट डॉ. तिलकराम याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले, सध्या त्याची प्रकृती ठीक आहे. पीडित डॉक्टरच्या भावाने कामराजपूर गावातील रहिवाशी सलमान आणि मेहबूब या दोन तरुणांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

डॉक्टरांनी 2 महिन्यांपूर्वी सलमानची पत्नी शगुफावर उपचार केले होते. उपचारादरम्यान शगुफाचा मृत्यू झाला. तेव्हापासून सलमानचे डॉक्टरसोबत खटके उडू लागले होते आणि तो त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. दोन्ही आरोपींवर 15-15 हजारांचे बक्षीस पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन पिस्तूल, काडतुसे आणि घटनेत वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News doctor firing case police arrested accused bijnor uttar prardesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.