डबल मर्डर! 'मी टोमणे मारणाऱ्या पत्नी आणि सासूची हत्या केली'; 'त्या' फोनने पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 05:42 PM2021-10-10T17:42:02+5:302021-10-10T17:44:16+5:30

Crime News : गेल्या काही दिवसांपासून आपण टोमणे सहन करत होतो, मात्र सहन करण्याची आपली क्षमता संपल्यामुळेच आपण हा टोकाचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

Crime News double murder in delhi man killed his wife and mother in law | डबल मर्डर! 'मी टोमणे मारणाऱ्या पत्नी आणि सासूची हत्या केली'; 'त्या' फोनने पोलीसही हैराण

डबल मर्डर! 'मी टोमणे मारणाऱ्या पत्नी आणि सासूची हत्या केली'; 'त्या' फोनने पोलीसही हैराण

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी आणि सासूची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने स्वत: पोलिसांना फोन करून आपण केल्याची माहिती दिली आहे. आपली पत्नी आणि सासूची हत्या केली असून आपल्याला घरी येऊन अटक करा, असा फोन आरोपीनेच पोलिसांना केला. सासू आणि पत्नीच्या सततच्या टोमण्यांना वैतागलेल्या व्यक्तीने दोघींचीही गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून आपण टोमणे सहन करत होतो, मात्र सहन करण्याची आपली क्षमता संपल्यामुळेच आपण हा टोकाचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील बाबा हरिदास नगर परिसरात ही घटना घडली. महेश असं आरोपीचं नाव असून तो त्याची पत्नी आणि सासूसोबत राहत होता. महेश कार खरेदी-विक्रीचं काम करायचा. पाच वर्षांपूर्वी निधीसोबत त्याचा प्रेमविवाह झाला होता आणि तो घरजावई म्हणून दिल्लीतील सासूच्या घरात राहत होता. 

टोमणे असह्य झाल्यामुळेच पत्नी आणि सासूला संपवण्याचा घेतला निर्णय

गेल्या काही दिवसांपासून सासू आणि पत्नीच्या टोमण्यांना महेश वैतागला होता. आपण घरजावई असल्यामुळेच आपल्याला सतत टोमणे खावे लागतात. टोमणे असह्य झाल्यामुळेच त्याने पत्नी आणि सासूला संपवण्याचा निर्णय घेतला. महेशने राहत्या घरात पत्नी आणि सासूला गोळ्या घातल्या. त्यानंतर पोलिसांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली. आपण आपल्या पत्नीचा आणि सासूची हत्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. 

महेशला पोलिसांनी केली अटक

पोलीस स्टेशनला स्वतः आरोपीचाच फोन आल्यामुळे पोलीसही हैराण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीने दिलेल्या पत्त्यावर धाव घेतली. त्यावेळी त्यांना सासू आणि पत्नीचा मृतदेह मिळाला. पोलिसांची वाट पाहत बसलेल्या आरोपी महेशला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी महेशविरुद्ध कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News double murder in delhi man killed his wife and mother in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.