Crime News Police Extra Marital Affaire बायकोला ड्युटीवर जातो सांगून प्रेयसीसोबत असायचा हवालदार; मेहुण्याला भनक लागली अन्
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 17:01 IST2022-04-21T17:01:21+5:302022-04-21T17:01:30+5:30
गोला बाजारमध्ये हा प्रकार पहायला मिळाला आहे. पोलीस लाईनमध्ये अधिक्षकांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या या हवालदाराने गोला बाजारमध्ये एक घर भाड्याने घेतले होते.

Crime News Police Extra Marital Affaire बायकोला ड्युटीवर जातो सांगून प्रेयसीसोबत असायचा हवालदार; मेहुण्याला भनक लागली अन्
मैनपुरी : प्रेम कितीही लपविले तरी ते लपत नाही. तरुण वयात, शाळा, कॉलेजमध्ये असताना याचा अनुभव अनेकांना आलेला असतो. लग्नानंतरही प्रेमाच्या नशेत बुडालेले अनेक असतात. अशाच एका हवालदाराची ही गोष्ट आहे. बायकोला ड्युटीवर जातो असे सांगून हा हवालदार प्रेयसीसोबत असायचा. आता त्याला ही मौजमस्ती चांगलीच महागात पडली आहे.
गोला बाजारमध्ये हा प्रकार पहायला मिळाला आहे. पोलीस लाईनमध्ये अधिक्षकांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या या हवालदाराने गोला बाजारमध्ये एक घर भाड्याने घेतले होते. तिथे तो फावल्या वेळत प्रेयसीसोबत मौजमज्जा करायचा. याची भनक त्याच्या मेहुण्याला लागली आणि पकडला गेला. मैनपुरीच्या आधी हा हवालदार राजउद्दीन बांदा येथे ड्युटीवर असायचा. तिथे त्याला ही प्रेयसी भेटली होती. त्यांच्यात सूत जुळल्यावर त्याने प्रेयसीला या घरात आणून ठेवले.
२० एप्रिलच्या रात्री तो अधिक्षकांच्या बंगल्यावरील ड्युटी संपवून प्रेयसीच्या घरी गेला होता. मेहुण्याला त्याच्या मित्रांनी ही गोष्ट सांगितली आणि मेहुण्याने आपल्या बहीणीला. मग काय दोघेही तिथे पोहोचले आणि हवालदाराला रंगेहाथ पकडले. पोलीस अधिक्षकांनीही या प्रकरणाची दखल घेत त्याला निलंबित केले आहे.
पोलिस अधीक्षक अशोक कुमार राय यांनी सांगितले की, पती-पत्नी दोघांमध्ये वाद सुरु होता. आज एका मुलीसोबत पोलीस पकडला गेला आहे. आरोपी कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. मुलीचे वडील जे काही तक्रार देतील त्या आधारे हवालदारावर कारवाई केली जाईल.