अंधश्रद्धेचा कळस! मुलाच्या हव्यासापोटी गर्भवती महिलेच्या डोक्यात ठोकला खिळा; झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 12:24 PM2022-02-12T12:24:54+5:302022-02-12T12:29:33+5:30
Crime News : महिलेनं स्वतः हा खिळा डोक्यातून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, खिळा न निघाल्याने ती शहरातील एका रुग्णालयात गेली.
पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेच्या डोक्यात दोन इंच लांब खिळा ठोकण्यात आल्याची काळजात चर्र करणारी घटना समोर आली आहे. सुदैवाने हा खिळा तिच्या डोक्यात खोल शिरला नाही आणि त्यामुळे तिचा मृत्यू झालेला नाही. Metro ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्यांसमोर एक अजब प्रकरण आलं, जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की महिलेच्या डोक्यात खिळा अडकलेला आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
डॉक्टर हैदर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी महिलेनं स्वतः हा खिळा डोक्यातून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, खिळा न निघाल्याने ती पेशावरच्या उत्तर-पश्चिमी शहरातील एका रुग्णालयात गेली. त्यावेळी ती पूर्णपणे शुद्धीवर होती मात्र अतिशय वेदनेत होती. जेव्हा तिच्या डोक्याचा एक्स-रे केला गेला तेव्हा त्यात दोन इंचाच खिळा दिसला. सुदैवाने हा खिळा डोक्यामध्ये खोलवर शिरला नव्हता, अन्यथा महिलेला आपला जीव गमवावा लागला असता.
महिलेनं सुरुवातीला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं की कोणाच्यातरी सल्लावरुन तिने स्वतः आपल्या डोक्यात खिळा ठोकून घेतला. मात्र, नंतर तिने सांगितलं की हे काम दुसऱ्याच व्यक्तीने केलं आहे. पेशावर पोलीस महिलेच्या डोक्यात खिळा ठोकणाऱ्याचा शोध घेत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
या महिलेला तीन मुली आहेत आणि चौथ्यांदाही तिच्या गर्भात मुलगीच होती. त्यामुळे ती एका फॅथ हिलरच्या संपर्कात आली, यावेळी त्याने मुलगाच होणार याची खात्री देत महिलेच्या डोक्यात खिळा ठोकला. या खिळ्यामुळे महिलेच्या डोक्याच्या वरच्या भागात खड्डा झाला होता. मात्र, सुदैवाने डोक्यात हा खिळा आतपर्यंत गेला नाही. डॉक्टरांनी सांगितलं की खिळा आतमध्ये घुसवण्यासाठी हातोडीचा किंवा इतर जड वस्तूचा वापर केला गेला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.