Crime News: इडली विक्रेत्याकडून पाच लाखांच्या बनावट नोटा जप्त. तामिळनाडूतील संशयितास अटक

By नामदेव भोर | Published: October 7, 2022 02:27 PM2022-10-07T14:27:45+5:302022-10-07T14:28:29+5:30

Crime News: नाशिक शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्यच्या हद्दीत हॉटेल छानच्या मागील भारतनगर परिसरात तब्बल ५ लाख ८ हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात पाेलिसांना यश आले असून या प्रकरमात पोलसांनी एका इडली व्यावसायिकास अटक केली आहे.

Crime News: Fake notes of five lakhs seized from idli seller. Suspect arrested from Tamil Nadu | Crime News: इडली विक्रेत्याकडून पाच लाखांच्या बनावट नोटा जप्त. तामिळनाडूतील संशयितास अटक

Crime News: इडली विक्रेत्याकडून पाच लाखांच्या बनावट नोटा जप्त. तामिळनाडूतील संशयितास अटक

googlenewsNext

- नामदेव भोर 

नाशिक : शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्यच्या हद्दीत हॉटेल छानच्या मागील भारतनगर परिसरात तब्बल ५ लाख ८ हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात पाेलिसांना यश आले असून या प्रकरमात पोलसांनी एका इडली व्यावसायिकास अटक केली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांमध्ये दोन हजार रुपयांच्या २४४ व पाचशे रुपयांच्या ४० बनावट नोटांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इडलीचा व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीकडून पाच लाख आठ हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा आणि ३३०० रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. संशयित .मलायारसन मदसमय (३३, मूळ कायथर पन्नीकार कुलूम तुदूकुडी, तामिळनाडू) बनावट नोटा विक्री करीत असल्याचा पोलिसांना संशय असून त्याला पोलिसानी भारतनगर भागातून अटक केली आहे. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या ४० बनावट नोटा आणि दोन हजार रुपयांच्या २४४ बनावट नोटा आढळल्या. या नोटा विक्री करण्यासाठी संशयिताने बाळगल्याचा पोलिसांना संशय आहे. बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणे, त्या खऱ्या असल्याचे भासवून वापरणे व बाळगल्या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा बाजारात चलनात आणताना पोलिसांनी ही कारवाई केलीअसून पोलीस त्याची कसून चाैकशी करीत आहेत. दरम्यान, बनावट नोटा चलनात आणणारी मोठी टोळी शहरात सक्रीय असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Crime News: Fake notes of five lakhs seized from idli seller. Suspect arrested from Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.