Crime News: सतत मोबाईल वापरते म्हणून वडील रागावले, संतापलेल्या तरुणीने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:27 PM2022-04-14T12:27:51+5:302022-04-14T12:28:31+5:30

Crime News: सतत मोबाईल पाहत असल्याच्या कारणावरून वडील १५ वर्षीय मुलीला रागावल्याने तिने मुळा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

Crime News: Father gets angry; The girl committed suicide | Crime News: सतत मोबाईल वापरते म्हणून वडील रागावले, संतापलेल्या तरुणीने जीवन संपवले

Crime News: सतत मोबाईल वापरते म्हणून वडील रागावले, संतापलेल्या तरुणीने जीवन संपवले

googlenewsNext

अहमदनगर - सतत मोबाईल पाहत असल्याच्या कारणावरून वडील १५ वर्षीय मुलीला रागावल्याने तिने मुळा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे गुरुवारी ( दि. १४ ) सकाळी उघडकीस आली. अक्षदा विकास वाघ (रा. प्रभकरनगर, आंबी खालसा , ता. संगमनेर )असे या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , विकास वाघ हे आंबीखालसा परीसरातील प्रभाकरनगर येथे मोलमजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी अक्षदा ही गावातीलच शाळेत नववीच्या वर्गात शिकत होती. अक्षदा ही सतत मोबाईलमध्ये बघत असल्याने बुधवारी रात्री तिचे वडील रागावले. याचा राग मनात धरत ती रात्री अकराच्या दरम्यान कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली.  परिसरात नातेवाईकांनी रात्रभर सदर मुलीचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. गुरुवारी सकाळी साडे आठ वाजलेच्या दरम्यान (दि. १४) ग्रामस्थांना तिचा मृतदेह मुळा नदीपात्रात पुलाखाली आढळून आला.

सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना समजताच नाईक राजेंद्र लांघे , संतोष खैरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. एकनाथ बाळू शिंदे (रा. आंबी खालसा ता. संगमनेर) यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करीत आहेत.

Web Title: Crime News: Father gets angry; The girl committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.