Crime News: सून-सासऱ्याच्या प्रेमाची भयावह अखेर, प्रेमात पडले, चार महिन्यांपूर्वी घरातून पळाले, आणि अखेर झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 06:12 PM2021-09-04T18:12:01+5:302021-09-04T18:14:01+5:30
Crime News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासामध्ये आणि आसपाच्या लोकांकडे केलेल्या चौकशीमध्ये सून आणि सासऱ्यांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे.
रायपूर - छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये पोलिसांना एक पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह एकत्र झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत. सदर पुरुष आणि महिलेमध्ये सासरे-सुनेचे नाते असल्याचे सांगण्यात येत आहे. बिलासपूरमधील चकरभाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कनेरीमध्ये गेल्या शुक्रवारी दोघांचेही मृतदेह दिसून आले. त्यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ( Fearful end of daughter-in-law & Father-in-law's love, fell in love, ran away from home four months ago, and was finally found hanging from a tree)
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासामध्ये आणि आसपाच्या लोकांकडे केलेल्या चौकशीमध्ये सून आणि सासऱ्यांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. चार महिन्यांपूर्वी दोघेही अचानक गाव सोडून बेपत्ता झाले होते. त्यानंतर आता दोघांचेही मृतदेह कनेरी गावातील एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत. आता ही आत्महत्या आहे की, काही वेगळा प्रकार, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहेत
मृतांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार खेलूराम केवट (५०) आणि त्याच्या पुतण्याची पत्नी गीता (३५) यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू होते.
खेलूराम शेतकरी होता आणि याच गावात शेती करत होता. त्याच्या पुतण्याचे कुटुंबही याच गावात राहते. दरम्यान, या दोघांमधील प्रेमप्रकरणाची माहिती कुटुंबीयांना समजली होती. त्यानंतर मार्च महिन्यापासून दोघेही बेपत्ता होते. त्यानंतर आता त्यांचे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्यामधील नात्याची माहिती कळल्यापासून कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण होते. दोघांना समजावले होते. मात्र ते ऐकले नाहीत आणि ते गाव सोडून गेले.
चकरभाठा पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील तिर्की यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मृत खेलूराम हा परोपकारी प्रृवृत्तीचा होता. गीताचा पती मानसिकदृष्टा कमकुवत आहे, तसेच त्याला मिर्गीचे झटकेही यायचे. खेलूराम त्याची मदत करायला जायचा. तेव्हाच तो आणि गीता एकमेकांच्या प्रेमात पडले. गीताचे सहा आणि चार वर्षाचे दोन मुलगे आहेत. तर खेलूरामचे पाच मोठे मुलगे आहेत. त्याच्या पत्नीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता.