Crime News: कपाळावर घाव, गळा चिरला, तरुणाची निर्घृण हत्या, मारेकरी आणि कारण अस्पष्ट

By सुनील पाटील | Published: October 3, 2022 04:06 PM2022-10-03T16:06:38+5:302022-10-03T16:07:47+5:30

Crime News: कपाळावर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने घाव घालून क्रुरपणे गळा चिरुन सौरभ यशवंत चौधरी (वय ३१, रा.दशरथ नगर, जळगाव) या तरुणाची हत्या झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली.

Crime News: Forehead wound, throat slit, brutal killing of youth, killer and motive unclear | Crime News: कपाळावर घाव, गळा चिरला, तरुणाची निर्घृण हत्या, मारेकरी आणि कारण अस्पष्ट

Crime News: कपाळावर घाव, गळा चिरला, तरुणाची निर्घृण हत्या, मारेकरी आणि कारण अस्पष्ट

Next

- सुनील पाटील 

जळगाव -  कपाळावर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने घाव घालून क्रुरपणे गळा चिरुन सौरभ यशवंत चौधरी (वय ३१, रा.दशरथ नगर, जळगाव) या तरुणाची हत्या झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. सौरभ याचा खून कोणी व कशासाठी केला हे कारण अजून तरी समोर आलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याने जाणाऱ्या लोकांना सोमवारी सकाळी ११ वाजता भादली ते शेळगाव दरम्यान पुलानजीकच्या पाटचारीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यापैकी काही जणांनी पोलीस पाटील तर काही जणांनी नशिराबाद पोलिसांना घटना कळविली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ विभागाचे डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहायक फौजदार अलियार खान, हवालदार शिवदास चौधरी, रवींद्र तायडे, लिना लोखंडे व गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता क्रुरपणे गळा चिरलेला तर कपाळावर घाव घालण्यात आलेले होते. दोन्ही हातांची त्वची बाहेर आलेली होती. घटनास्थळाचा पंचनामा करुन दुपारी तीन वाजता मृतदेह शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला.

दरम्यान, दोन दिवसापूर्वीच चारित्र्याच्या संशयावरुन सविता जितेंद्र पाटील (वय २०) हिचा खून पतीनेच खून केल्याची घटना शिवधाम मंदिर परिसरात घडली होती. आता हा दुसरा खून आहे.

Web Title: Crime News: Forehead wound, throat slit, brutal killing of youth, killer and motive unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.