मैत्री, प्रेम अन् फसवणूक... 'तिने' सौंदर्याच्या जाळ्यात अडकवलं, तब्बल 10 लाखांना गंडवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 05:17 PM2023-01-07T17:17:52+5:302023-01-07T17:18:53+5:30
एका मेडिकल स्टोअर संचालकाची तब्बल 10 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
एका तरुणाला फेसबुकवरची मैत्री चांगलीच महागात पडली आहे. लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका मेडिकल स्टोअर संचालकाची तब्बल 10 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्याला गरीब मुलीशी लग्न करायचे होते. यासाठी त्याने फेसबुकवर एक पोस्ट टाकून आपली इच्छा सांगितली. मग तो पुष्पांजली नावाच्या मुलीशी बोलू लागतो.
पुष्पांजलीने गोड बोलण्यात अडकवून वर्षभरात मेडिकल संचालकाकडून 10 लाख रुपये उकळले. संचालकाला आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती मिळताच त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आणि मदत मागितली. मुकेश साहू यांचे कानपूरमध्ये मेडिकल स्टोअर आहे. आपली सून गरीब कुटुंबातील असावी, अशी मुकेशच्या वडिलांची इच्छा होती. वडिलांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मुकेशने एफबीवर पोस्ट केली.
मुकेशने लिहिले की, त्याला एका गरीब कुटुंबातील मुलीशी लग्न करायचे आहे. काही दिवसांनी त्याला पुष्पांजली पटेल नावाच्या फेसबुक आयडीवरून रिक्वेस्ट आली. पुष्पांजलीच्या आयडीवरील प्रोफाईल पिक्चर खूप सुंदर असल्याचे मुकेशने पाहिले होते. यानंतर मुकेशने तिच्यासोबत संवाद साधायला सुरुवात केली. फोटोत मुलगी सुंदर दिसत होती त्यामुळे आपला शोध संपल्याचे मुकेशला वाटले.
मुकेश पुष्पांजलीशी बोलू लागला. याच दरम्यान पुष्पांजलीने मुकेशला सांगितले की, माझ्या वडिलांना मला एका व्यावसायिकाला विकायचे आहे. कारण माझ्या वडिलांनी त्यांच्याकडून कर्ज घेतले आहे. मुलीने मुकेशकडे 13 हजार रुपयांची मागणी केली. मुकेशने पुष्पांजलीच्या बँक खात्यात पैसे पाठवले. 13,000 रुपयांपासून सुरू झालेला गेम एका वर्षात 10 लाखांपर्यंत पोहोचला. यादरम्यान मुकेशने पुष्पांजलीला भेटण्यास सांगितले तर तिचे वडील रागावतील असे तिने सांगितले होते. यानंतर मुकेशला संशय आला.
पुष्पांजली स्वतःला बिलासपूरची रहिवासी सांगायची. यानंतर मुकेश बँकेत पोहोचला, ज्या खाते क्रमांकावर तो पैसे पाठवत असे. तेव्हा जी स्वतःला फेसबुकवर पुष्पांजली पटेल म्हणवत होती. बँक खात्यात तिचे नाव मनीषा चौहान असल्याचे निष्पन्न झाले. बँकेने दिलेल्या पत्त्यावर मुकेश पोहोचला तेव्हा त्याला मनीषा ही मध्यमवयीन महिला असल्याचे दिसले. मुकेशने तिच्याशी संवाद साधला असता, ती म्हणाली की, ती एकाही पुष्पांजलीला ओळखत नाही. तसेच मुकेशला तेथून निघून जाण्यास सांगितले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"