Crime News: सोशल मीडियावर मैत्री, मग अपहरण, नंतर न्यूड व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग, अखेर आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 04:02 PM2022-02-08T16:02:51+5:302022-02-08T16:03:26+5:30
Crime News: दिल्लीमध्ये एमबीए स्टुडंटचे पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करून न्यूड व्हिडीओ तयार करून नंतर त्याला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये एमबीए स्टुडंटचे पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करून न्यूड व्हिडीओ तयार करून नंतर त्याला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपहरण केल्यानंतर आरोपींनी न्यूड व्हिडीओ तयार करून आरोपींनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विक्रांत सूद याला अटक केली आहे.
दरम्यान, पीडित कुटुंबाने दिल्ली पोलिसांचे स्पेशल सी.पी. सागर प्रीत हुड्डा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, कशाप्रकारे आरोपींनी एमबीए विद्यार्थी असलेल्या तरुणाला गन पॉईंटवर किडनॅप केले. त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. दरम्यान, पीडित तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी विक्रांत सूद याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित एमबीएस विद्यार्थी कुटुंबीयांसह आरकेपूरम येथील एका पॉश कॉलनीमध्ये राहतो. आरोपींनी या विद्यार्थ्याशी सोशल मीडियावरून त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर आरोपींनी त्याचे अपहरण करून पिस्तुलाचा धाक दाखवून त्याचा न्यूड व्हिडीओ बनवला. त्याबदल्यात २० लाख रुपयांची मागणी केली. मात्र पीडित कुटुंबाकडून पाच लाख रुपये वसूल केल्यानंतरही आरोपींनी हा न्यूड व्हिडीओ व्हायरल केला. तसेच ते पीडित विद्यार्थ्याकडे अधिक पैशांची मागणी करत होते. त्यानंतर पीडित कुटुंबाने पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत गुन्हा दाखल करण्याची मगाणी केली. यादरम्यान पीडित तरुणाने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.