भयंकर! मुलीवर सामूहिक अत्याचार, अॅसिडने 'ओम' टॅटू काढला, जबरदस्तीने गोमांस खायला दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 14:35 IST2025-03-06T14:20:12+5:302025-03-06T14:35:20+5:30
एका अल्पवयीन तरुणीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

भयंकर! मुलीवर सामूहिक अत्याचार, अॅसिडने 'ओम' टॅटू काढला, जबरदस्तीने गोमांस खायला दिले
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भगतपूर परिसरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आठवड्यापूर्वी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. आरोपींनी पीडितेला घरात ओलीस ठेवल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यावेळी अल्पवीयन मुलीला गोमांस खायला दिले आणि तिच्या हातावरील ओम टॅटूवर अॅसिड टाकून तो पुसून टाकण्यात आला.
या प्रकरणात पीडितेच्या मावशीच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार नामांकित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सलमान नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
चारित्र्यावर संशय, गरोदर पत्नीला निर्घृणपणे संपवलं आणि नंतर...; सैतान पतीचं धक्कादायक कृत्य उघड
एका महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, २ जानेवारी रोजी तिची १४ वर्षांची अल्पवयीन भाची कपडे शिवण्यासाठी बाजारपेठेतील रस्त्याने एका शिंपीच्या दुकानात जात होती. त्यांच्या गावातील चार तरुण बाजाराजवळ गाडी घेऊन रस्त्यावर उभे होते. चारही आरोपींनी त्यांच्या भाचीला त्यांच्या गाडीत ओढले आणि तिचे अपहरण केले. आरोपीने तिला एका खोलीत नेले आणि तिला नशा देणारे पदार्थ देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने मुलीवर खूप अत्याचार केले. एवढेच नाही तर भूक लागल्यावर तिला जबरदस्तीने गोमांस खायला दिले जात होते असंही आरोपात म्हटले आहे.
आरोपीने मुलीच्या हातावर अॅसिड ओतून ओमचा टॅटुही पुसून टाकला. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिची भाची बेपत्ता झाल्यापासून ते तिचा शोध घेत होते. सुमारे दोन महिन्यांनंतर, २ मार्च रोजी, मुलगी अस्वस्थ अवस्थेत घरी पोहोचली आणि तिने तिच्या कुटुंबातील सदस्यांना तिच्यावर झालेला अत्याचार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी भगतपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात सलमान, जुबैर, रशीद आणि आरिफ यांच्याविरुद्ध बलात्कार, पॉक्सो कायदा आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सलमानला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.