सुशीलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विकणार होता तरूण, तरूणीने फोनवरचं बोलणं ऐकलं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 09:45 AM2023-03-13T09:45:48+5:302023-03-13T09:46:01+5:30
Crime News : ही घटना जिल्ह्यातील संजोरी गावातील आहे. इथे राहणारी 26 वर्षीय सुशीला हांसदा 11 जानेवारीला घरातून हे सांगून निघाली की, ती दुमका इथे तिची मैत्रीण प्रमिलाकडे जात आहे.
Crime News : झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून एक हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरूणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरूणासोबत ओळख झाली. नंतर त्यांच्यात प्रेम संबंध झाले. लग्नाचं आमिष दाखवत तरूणाने तरूणीला आपल्या जवळ बोलवलं आणि तिला विकण्याचा प्लान केला. तरूणीने याचा विरोध केला तर तरूणाने आपल्या साथीदारांसोबत मिळून तिची हत्या केली.
ही घटना जिल्ह्यातील संजोरी गावातील आहे. इथे राहणारी 26 वर्षीय सुशीला हांसदा 11 जानेवारीला घरातून हे सांगून निघाली की, ती दुमका इथे तिची मैत्रीण प्रमिलाकडे जात आहे. तिच्याकडे तिचं एटीएम राहिलं आहे. त्यानंतर ती गायब झाली. नंतर तिच्या भावाने पोलिसात तक्रार दिली तर पोलिसांनी प्रमिलाला संपर्क केला. तिने सांगितलं की, सुशीला तिच्याकडे आलीच नाही.
त्यानंतर पोलिसांनी एक टीम तयार केली. टीमल सुशीलाचा भाऊ जॉनसने सांगितलं होतं की, पालोजोरी देवघर इथे राहणाऱ्या अरबाज आलम नावाच्या एका मुलाबाबत बहिणीने सांगितलं होतं. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यादरम्यान अरबाज आलम आणि त्याची पत्नी मिसलता टूडू उर्फ रेहिना बीवीला केरळहून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन तरूणींना ताब्यात घेण्यात आलं. या अरबाजने केरळमध्ये विकल्या होत्या.
चौकशी दरम्यान समजलं की, सुशीला हिला मानव तस्करीचा मुख्य अरबाज याने सोशल मीडियावर लग्नाचं आमिष दाखवत प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. त्यानंतर तिला आपल्या भाड्याच्या घरात बोलवलं होतं. इथे तो आणि त्याच्या पत्नीशिवाय प्रियंका व साहिल नावाचा तरूणही होता. सुशीला 11 आणि 12 जानेवारीला तिथेच राहिली. रात्री उशीरा अरबाज कुणासोबत तरी फोनवर सुशीलाला 50 हजार रूपयात विकण्याचं बोलत होता, तर समोरची व्यक्ती 30 हजार रूपये म्हणत होती. हे सुशीलाने ऐकलं होतं.
सुशीलाने याचा विरोध केला तेव्हा सगळ्यांनी मिळून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह बाइकवरून शिकारीपाडा भागातील जंगलात नेला. तिथे पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. पोलिसांनी सांगितलं की, आरोपींविरोधात केस दाखल करण्यात आली आहे.