अजबच! 1.5 लाख अन् सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरांनी मारला डल्ला, टीव्हीवर लिहिलं 'I Love You' 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 10:17 PM2022-05-26T22:17:11+5:302022-05-26T22:19:53+5:30

Crime News : घरातून पसार होताना त्यांनी टीव्हीच्या स्क्रीनवर चक्क आय लव्ह यू लिहिलं. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Crime News goa thieves who entered house after stealing cash and gold silver wrote in message i love you | अजबच! 1.5 लाख अन् सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरांनी मारला डल्ला, टीव्हीवर लिहिलं 'I Love You' 

अजबच! 1.5 लाख अन् सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरांनी मारला डल्ला, टीव्हीवर लिहिलं 'I Love You' 

googlenewsNext

गोव्यामध्ये चोरीची एक अजब घटना समोर आली असून सध्या फक्त त्याचीच जोरदार चर्चा रंगली आहे. चोरट्यांनी एका घरातील 1.5 लाख रोख आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यानंतर चोरांनी असं काही केलं की ते पाहून पोलिसांसह सर्वच जण हैराण झाले आहेत. घरातून पसार होताना त्यांनी टीव्हीच्या स्क्रीनवर चक्क आय लव्ह यू लिहिलं. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यामध्ये राहणारे असीब जेक दोन दिवसांसाठी त्यांच्या कुटुंबासोबत एका लग्न सोहळ्यासाठी बाहेर गेले होते. घरी परतल्यावर त्यांना त्यांच्या घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं. बाथरूमचे लोखंडी गज कापण्यात आल्याचं त्यांनी पाहिलं. घरातलं सामान सर्वत्र पसरलेलं होतं. त्याचवेळी कुटुंबीयांचं लक्ष टीव्हीकडे गेलं. टीव्हीच्या स्क्रीनवर मार्करने 'I Love You' लिहिण्यात आलेलं होतं.

असीब जेक यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. घरातील दीड लाखांची रोकड आणि दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी श्वानपथक कामाला लावलं. यासोबतच फिंगरप्रिंट तज्ज्ञाचीदेखील मदत घेतली जात आहे. आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हींचं फुटेज गोळा करून ते तपासलं जात आहे. चोरांनी पळून जाताना टीव्ही स्क्रीनवर लिहिलेल्या 'I Love You'मुळे सध्या या चोरीची तुफान चर्चा रंगली आहे.
 

Web Title: Crime News goa thieves who entered house after stealing cash and gold silver wrote in message i love you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.