संतापजनक! आजोबांनी केलं लैंगिक शोषण; मदतीसाठी 'ती' भाऊ अन् काकाकडे गेली तर त्यांनीही केले अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 01:11 PM2021-08-16T13:11:56+5:302021-08-16T13:17:54+5:30
Crime News : रात्री झोपेत असताना आजोबांनी मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं. त्यानंतर मदतीसाठी काका आणि भावाकडे गेली असता त्या दोघांनी देखील अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.
नवी दिल्ली - देशात बलात्काराच्या, महिलांवरील अत्याचाराच्या अनेक भयंकर घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील आजोबा, काका आणि भावाने चिमुकलीचं लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रात्री झोपेत असताना आजोबांनी मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं. त्यानंतर मदतीसाठी काका आणि भावाकडे गेली असता त्या दोघांनी देखील अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. तामिळनाडूमध्ये ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात एका 62 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीनो सात वर्षांच्या नातीचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच मुलीला मारहाण देखील करण्यात आली. मारहाण केल्या प्रकरणात मुलीचा काका आणि मुलीच्या 16 वर्षीय भावालाही अटक करण्यात आली आहे. ही घटना चेन्नईजवळील मडिप्पकममध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांचा ऑनलाईन क्लास असल्याकारणाने आजोबा आपल्या नातवांना घरी घेऊन आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा एक मुलगाही राहत होता.
धक्कादायक! 'तो' तिला भेटायला गेला अन् जीव गमावला; कुटुंबीयांचा गंभीर आरोप, जाणून घ्या, नेमकं काय घडलं? #crime#Policehttps://t.co/rNQVyhfiLD
— Lokmat (@MiLOKMAT) August 14, 2021
पोलिसांनी सांगितले की, 2 ऑगस्टच्या रात्री चिमुकली झोपली होती. त्यावेळी तिच्याच शेजारी झोपलेले तिचे आजोबा तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. या प्रकारामुळे घाबरलेली मुलगी मदतीसाठी तिच्या काकाच्या खोलीत गेली आणि तिला शांत करण्याच्या नावाखाली काकाने देखील तिच्यासोबत गैरवर्तन केले. यानंतर मुलगी पुन्हा तिच्या 16 वर्षांच्या भावाकडे मदतीसाठी गेली. पण तिची सुटका झाली नाही आणि तिच्या भावानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
बाबो! लग्नाच्या 8 वर्षांनंतर एका मुलीची आई पडली प्रेमात; पतीने पत्नीचं लावलं दुसरं लग्न, नातेवाईक झाले हैराण#marriage#husband#Wifehttps://t.co/xTBiqOtrYu
— Lokmat (@MiLOKMAT) August 14, 2021
रविवार 8 ऑगस्ट रोजी, जेव्हा मुलीची आई तिला भेटायला गेली, तेव्हा तिने पाहिले की मुलगी आजारी पडली आहे. ती मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेली. 7 वर्षांच्या मुलीने हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. मेडिकल चेकअप केल्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं. मुलीच्या आईने मडिप्पकम ऑलवुमन पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. आजोबा, काका यांना तुरुंगात पाठविण्यात आलं आहे. तर 16 वर्षीय मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयंकर! चिमुकलीचं अपहरण करून हत्या; एका मांत्रिकाला अटक#Crime#Police#Indiahttps://t.co/ugNKkIfWyz
— Lokmat (@MiLOKMAT) August 12, 2021