भयंकर! संपत्तीच्या हव्यासापोटी मुलगीच झाली हैवान; पित्याची डोक्यात वीट घालून केली निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 08:39 AM2021-11-15T08:39:14+5:302021-11-15T08:42:38+5:30
Crime News : केयाचा वडिलांसोबत संपत्तीवरुन वाद सुरू होता. यातूनच दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी एका मुलीनेच आपल्या जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात वीट घालत त्यांची निर्घृण हत्या केली आहे. पश्चिम बंगालमधील हुगली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. कालीपद दास (83) असं मृत वडिलांचे तर केया दास( 40) असं आरोपी मुलीचं नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी मुलीला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी केया दास हिचा घटस्फोट झाला असून सध्या ती हुगळी जिल्ह्यातील उत्तरपारा भद्रकाली येथील प्रशांत दत्ता सरानी भागातील वडिलांच्या घरी आपल्या मुलासोबत राहते. केयाचा वडिलांसोबत संपत्तीवरुन वाद सुरू होता. यातूनच दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी केया आणि कालीपद यांच्या संपत्तीवरुन भांडण झाले. यानंतर कालीपद हे अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले. त्यावेळी केयाही त्यांच्या पाठोपाठ बाथरुममध्ये गेली आणि आपल्या डोक्यात जड वस्तू घालून वार केला. यात कालीपद यांचा मृत्यू झाला.
केयाचा मुलगा अभिषेक घटनेनंतर फरार
कालीपद दास हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी होते. घटनेची माहिती मिळताच उत्तरपारा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथे बाथरूममध्ये कालीपाद यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. केयाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चंदननगर पोलीस आयुक्तालयाचे डीसीपी डॉ. अरविंद आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा वडिलांसोबत मालमत्तेचा वाद सुरू होता, त्यामुळे दोघांमध्ये वाद वाढला. तर केयाचा मुलगा अभिषेक घटनेनंतर फरार झाला आहे.
संपत्तीसाठी मुलीने जन्मदात्या वडिलांचाच काढला काटा
पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच उत्तरपारा-कोटरंग नगरपालिकेचे प्रशासक दिलीप यादव घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटीत केया आपल्या मुलासोबत वडिलांच्या घरी राहत होती आणि त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. त्यामुळेच तिने वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा काटा काढला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.