नवरी जोमात, नवरदेव कोमात! सासरच्यांना दिल्या झोपेच्या गोळ्या; दागिने, पैसे घेऊन झाली पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 17:03 IST2021-09-26T16:57:32+5:302021-09-26T17:03:36+5:30
Crime News : लग्नानंतर सासरी आलेल्या नवरीने नवरदेवालाच गंडा घातल्याची घटना घडली आहे.

नवरी जोमात, नवरदेव कोमात! सासरच्यांना दिल्या झोपेच्या गोळ्या; दागिने, पैसे घेऊन झाली पसार
नवी दिल्ली - देशात फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सासरी आलेल्या नवरीने नवरदेवालाच गंडा घातल्याची घटना घडली आहे. रोहतकमध्ये ही घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत दागिने आणि पैसे घेऊन नवरी पळून गेल्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवरीने सासरच्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर ती घरातील सोन्याचे दागिने आणि काही पैसे घेऊन पसार झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहतकच्या बोहर गावामध्ये ही घटना घडली आहे.
सुरेश कुमार नावाच्या एका व्यक्तीने काही लोकांच्या फसवणुकीला बळी पडून छत्तीसगडच्या एक तरुणीसोबत कोर्टात लग्न केलं. ती तरूणी त्याच्यापेक्षा वयाने दहा वर्षे मोठी होती. लग्नासाठी त्याने मध्यस्थी असलेल्या लोकांना 70 हजार रुपये देखील दिले. लग्नानंतर ती तरुणी कुटुंबात मिसळून गेली. सर्वांशी चांगलं वागून तिने सर्वांचं मन जिंकलं. त्यामुळेच तिच्यावर सासरच्या मंडळींचा खूप विश्वास होता. मात्र आता सासरच्या मंडळींना झोपेच्या गोळ्या देऊन ती घरातील दागिने आणि पैसे घेऊन पसार झाली आहे.
लग्नानंतर दागिने, पैसे घेऊन नवरी पळाली
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तरुण जेव्हा पोलिसांकडे तक्रार घेऊन आला तेव्हा पोलिसांनी त्य़ाला दोन, तीन दिवस पाट पाहायला सांगितली. ती कदाचित परत येईल असं म्हटलं, पण नवरी काही परत आली नाही. सुरेश कुमार यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आपल्या आईच्या ऑपरेशनसाठी जवळपास 70 हजार जमा केले होते. तसेच त्याच्या घरामध्ये काही दागिने देखील होते. पण नवरी हे सर्व पैसे आणि दागिने घेऊनच पळून गेली आहे. य़ा घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस आरोपी तरुणीचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"एक लाख दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल करू"; महिला कॉन्स्टेबलला फेसबुकवरील मैत्री पडली महागातhttps://t.co/uuQRIKrHdy
— Lokmat (@MiLOKMAT) September 26, 2021
माणुसकीला काळीमा! चोरीच्या संशयावरून मुलाला मारहाण, गाडीला बांधून दिला विजेचा शॉक
बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाला मोबाईलची चोरी केल्याच्या आरोपावरून जमावाने त्याला मारहाण करत विजेचा शॉक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा मोबाईल चोरला असा आरोप मुलावर करण्यात आला. त्यानंतर जमावाने या मुलाला पकडून गाडीला बांधलं आणि मारहाण केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
भयंकर! गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून त्याने टोकाचं पाऊल उचललं; आत्महत्या करून जीवन संपवलंhttps://t.co/8I2jOMK1iC
— Lokmat (@MiLOKMAT) September 25, 2021