रिसेप्शनच्या दिवशीच नवरदेवाने चाकूने वार करत नवरीची केली हत्या, दोन दिवसांआधीच केलं होतं लव्ह मॅरेज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 09:00 AM2023-02-23T09:00:44+5:302023-02-23T09:01:33+5:30
Crime News : घटनेच्या दोन दिवसांआधी दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. पोलीस कुटुंबियांची चौकशी करत आहेत.
Crime News : छत्तीसगढच्या रायपूरमध्ये हत्या आणि आत्महत्येच्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. इथे लग्नाच्या रिसेप्शनच्या दिवशीच नवरीची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. हैराण करणारी बाब म्हणजे नवरीची हत्या नवरदेवानेच केली. एक दिवसाआधीच लग्न झालेल्या नवरीची हत्या केल्यानंतर नवरदेवाने आत्महत्या केली. या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे. ज्या घरात लग्नाचा जल्लोष सुरू होता, तिथे आता शोककळा पसरली आहे.
घटनेच्या दोन दिवसांआधी दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचे आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. पोलीस कुटुंबियांची चौकशी करत आहेत.
राजातालाब परिसरात राहत असलेल्या कहकशां बानो(22) चा निकाह असलमसोबत 19 फेब्रुवारीला झाला होता. 21 तारखेला रात्री त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन होतं. परिवारातील सगळे लोक तयारी करत होते. आनंदाचं वातावरण होतं. असलम आणि कहकशां सुद्धा रूम बंद करून तयार होत होते. काही वेळाने रूममधून ओरडण्याचा आवाज आला.
कुटुंबियांनी रूम उघडून पाहिली तर दोन मृतदेह पडले होते. कहकशांच्या शरीरावर कपडेही नव्हते. लगेच या घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना आढळलं की, कहकशांच्या पोटावर, छातीवर, हातावर चाकूने वार केले आहेत. असं वाटत होतं की, त्यांच्या मारहाण झाली असेल.
पोलीस अधिकारी राजेश चौधरी यांनी सांगितलं की, मंगळवारी रात्री साधारण 7 वाजता नवरीला तयार करण्यासाठी एक ब्युटिशिअन असलमच्या घरी पोहोचली होती. नवरदेवाने तिला रूममधून बाहेर पाठवलं आणि दोघेही कपडे बदलत होते. तेव्हाच दोघांमध्ये असंकाही झालं की, नवरदेवाला राह आला आणि त्याने चाकूने नवरीवर हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यानेही आत्महत्या केली.
दोघांचं रूममध्ये असताना भांडण कशावरून झालं याची शोध घेतला जात आहे. पोलिसांनी असलम आणि गावात पोलीस फोर्स वाढवली आहे. राजातालाब परिसरात शेकडो लोक जमा झाले होते. सगळ्यांना या हत्येमागे काय कारण आहे? असा प्रश्न पडला होता.