बाबो! वीज गेली म्हणून नववधूला खोलीत ठेवून बाहेर गेला नवरा; परत येताच हादरला, झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 04:15 PM2022-06-01T16:15:33+5:302022-06-01T16:22:08+5:30

Crime News : लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहितेने असा धक्का दिला की, नवरदेव हादरला.

Crime News groom went to roof after electricity cut finds bride missing on first night of marriage | बाबो! वीज गेली म्हणून नववधूला खोलीत ठेवून बाहेर गेला नवरा; परत येताच हादरला, झालं असं काही...

बाबो! वीज गेली म्हणून नववधूला खोलीत ठेवून बाहेर गेला नवरा; परत येताच हादरला, झालं असं काही...

googlenewsNext

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहितेने असा धक्का दिला की, नवरदेव हादरला. लग्नाच्या पहिल्या रात्री अचानक घरातील वीज गेली. अशा स्थितीत नववधूला खोलीत ठेवून नवरदेव बाहेर आला पण काही वेळाने तो परत आला असता तेथून वधू बेपत्ता असल्याचे दिसलं. यानंतर त्याने नववधूचा शोध सुरू केला. मात्र तिचे सर्व सामानही गायब असल्याचे आढळले. याशिवाय घरात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कमही अचानक गायब झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, शाहजहांपूरमधील कटरा पोलीस स्टेशनच्या पलिया दरोबस्त गावात ही घटना घडली आहे. येथे रिंकू सिंह नावाच्या तरुणाचे कुशीनगर जिल्ह्यातील पतारबा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या काजलसोबत लग्न झाले. 27 मे रोजी वरात घेऊन तो कुशीनगरला गेला आणि 28 मे रोजी वधूसोबत परतला. रिंकू सिंहने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या पहिल्या रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास वीज गेली. थोड्यावेळाने पती खोलीत गेला असता पत्नी तेथे दिसली नाही. 

पत्नीला फोन केला असता तिचा फोनही बंद येत होता. अशा स्थितीत रिंकूने घरातील इतर लोकांना उठवून वधू बेपत्ता झाल्याची माहिती दिली. घरचे लोक नवीन नवरीला शोधू लागले. यावेळी घरातून सोन्या-चांदीचे दागिने, 11 हजार रुपयांची रोख रक्कम, मोबाईल आणि इतर अनेक वस्तू गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अशा स्थितीत त्यांना फसवणूक झाल्याचं समजलं. 

रिंकूने मंगळवारी पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी त्या नवरीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाची माहिती देताना पटरबा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रवीणकुमार सोळंकी यांनी सांगितले की, वधूचा फोन सध्या बंद आहे. सायबर सेल आणि कुशीनगर पोलिसांच्या मदतीने माहिती गोळा केली जात आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News groom went to roof after electricity cut finds bride missing on first night of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.