Crime News : घरात पत्नीला जाळत होता पती, दुर्गंध येताच शेजारच्यांनी विचारले तर म्हटला...; पाहणारे हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 06:58 PM2022-02-11T18:58:11+5:302022-02-11T18:58:32+5:30

पतीने पत्नीला घरातच जिवंत जाळून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.

Crime News husband burned his wife alive in west bengal jharkhand border area police investigating 4 arrested | Crime News : घरात पत्नीला जाळत होता पती, दुर्गंध येताच शेजारच्यांनी विचारले तर म्हटला...; पाहणारे हादरले

Crime News : घरात पत्नीला जाळत होता पती, दुर्गंध येताच शेजारच्यांनी विचारले तर म्हटला...; पाहणारे हादरले

googlenewsNext

Crime News West Bengal:  पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये पतीच्या क्रूरतेची एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे पतीने पत्नीला घरातच जिवंत जाळून ठार केल्याची घटना घडली. दुर्गंध आल्यावर शेजाऱ्यांनी त्या व्यक्तीला काय करत आहेस असा प्रश्न केला. त्यावेळी आपण मांस शिजवत असल्याचं उत्तर त्यानं दिलं. परंतु शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी घरात डोकावून पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसनसोलच्या जामुरिया येथील निघा भागात राहणारी कांचन नोनिया हिचा विवाह २०१५ मध्ये आसनसोल दक्षिण पोलीस स्टेशन हद्दीतील धेमोमेन कोलियरी येथे राहणारा सुधीर नोनिया याच्याशी झाला होता. दरम्यान, गुरुवारी सुधीरच्या घरात काहीतरी जळत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले.

धूर आणि दुर्गंधीबाबत विचारणा केली असता सुधीरने सांगितले की, घरात मांस तयार केले जात होते. मात्र शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता तो कांचनचा मृतदेह जाळत असल्याचे दिसून आले. काही लोकांनी आपल्या मोबाईलमधून या घटनेचा व्हिडीओ काढला. या घटनेत कांचनचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सध्या चार आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती डीसीपी डॉ. कुलदीप एसएस यांनी दिली.

नातेवाईक म्हणाले, हुंड्यासाठी मुलीची हत्या
कांचनच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सुधीरने लग्नादरम्यान हुंडा म्हणून तीन लाख रुपये घेतले होते. सुधीर आणि त्याच्या कुटुंबीयांनी कांचनवर हुंडा आणण्यासाठी दबाव टाकला होता. त्याला २० हजार रुपयांचा ब्लेझर हवा होता. ही गोष्ट आम्हाला मुलीनं सांगितली होती. पैसे न दिल्यास सासरचे लोक मारतील, असे त्याने सांगितले होते आणि ते आता खरं ठरल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कांचनचा पती सुधीर, सासरा गुलाब नोनिया, सासू मैना देवी आणि जावई अर्जुन नोनिया यांना अटक केली आहे.

दरम्यान, महिलेचा पती बेरोजगार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलाचे वडील कोळशाच्या खाणीत काम करतात. दरम्यान, ही गोष्ट कशी घडली हे आपल्याला माहिती नसल्याचं तो पोलिसांना सांगत असल्याचंही समरो आलं आहे. त्याच्या दाव्याबाबत पोलीस शेजाऱ्यांकडेदेखील चौकशीही करत आहेत.

Web Title: Crime News husband burned his wife alive in west bengal jharkhand border area police investigating 4 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.