"पैसे दिले नाही तर धमकवायच्या"! पत्नी-सासूला कंटाळून पतीची आत्महत्या; सुसाईड नोटने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 12:55 PM2022-04-01T12:55:33+5:302022-04-01T12:57:24+5:30

Crime News : पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवलं.

Crime News husband commits suicide troubled by wife and mother in law suicide note found in pocket | "पैसे दिले नाही तर धमकवायच्या"! पत्नी-सासूला कंटाळून पतीची आत्महत्या; सुसाईड नोटने खळबळ

"पैसे दिले नाही तर धमकवायच्या"! पत्नी-सासूला कंटाळून पतीची आत्महत्या; सुसाईड नोटने खळबळ

Next

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवलं. हरियाणातील भिवानीमध्ये पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुशील (44) असं आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुशीलने सुसाईड नोट लिहिली होती. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये सुशीलने पत्नी आणि सासूच्या दररोजच्या मागण्या आणि धमक्यांना कंटाळून सुशीलने आपल्या मूळ गावी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. सुशील आणि त्याची पत्नी शीला हे दोघे काही वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांनी मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर दोघेही शीलाच्या आईच्या घरी राहत होते. पत्नी आणि सासू दररोज सुशीलकडे पैशांची मागणी करायच्या. 

पैसे दिले नाही तर दोघीही त्याला वारंवार धमकावत असत, अशी माहिती सुशीलचा भाऊ समशेरने दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह आणि सुसाईड नोट ताब्यात घेतले. सुसाईड नोट आणि नातेवाईकांच्या तक्रारीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. सध्या याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलीस तपासानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News husband commits suicide troubled by wife and mother in law suicide note found in pocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.