संतापजनक! कोरोनामुळे पतीला गमावलं; मुलगी होताच सासरच्यांनी उपाशी ठेवलं, बेदम मारलं, घराबाहेर काढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 04:40 PM2021-08-26T16:40:17+5:302021-08-26T16:46:13+5:30

Crime News : कोरोनाने अनेकांच्या जवळची माणसं हिरावून नेली आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे.

Crime News Husband Died Due to corona girl was born, her father-in-law kicked her out of the house | संतापजनक! कोरोनामुळे पतीला गमावलं; मुलगी होताच सासरच्यांनी उपाशी ठेवलं, बेदम मारलं, घराबाहेर काढलं

संतापजनक! कोरोनामुळे पतीला गमावलं; मुलगी होताच सासरच्यांनी उपाशी ठेवलं, बेदम मारलं, घराबाहेर काढलं

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,25,58,530 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46,164 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 607 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 436365 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक दु:खद घटना समोर येत आहेत. कोरोनाने अनेकांच्या जवळची माणसं हिरावून नेली आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. आई झाल्याचा आनंद तर दुसरीकडे नवऱ्याला गमावल्याचं दु:ख एका महिलेच्या वाट्याला आलं आहे. बिहारमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. 

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्यानंतर महिलेने मुलीला जन्म दिला. यानंतर सासरच्या मंडळीनी महिलेचे प्रचंड हाल केले. तिला उपाशी ठेवलं, बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलगी झाल्यानंतर तिला घराबाहेर काढलं. महिलेला घरात राहू देण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. महिलेच्या सासूने "मला एकच मुलगा होता. मात्र कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला. मुलगी खानदान पुढे नेणार नाही" असं म्हटलं आहे. आपल्या मुलीला अधिकार मिळावेत म्हणून महिलेने राष्ट्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका शाही कॉम्प्लेक्समध्ये महिलेचं सासर आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या जन्म झाल्यावर काही दिवसांनी महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ती आपल्या सासरी गेली. तेव्हा सासरच्या मंडळींनी घराला टाळं लावलं. तसेच काही दिवसांनी तिला मारहाण करायला सुरुवात केली. उपाशी ठेवलं आणि नंतर घरातून बाहेर काढलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाने अनेकांच्या जवळची माणसं हिरावून नेली आहे. तर काहींच्या डोक्यावरचं आई-वडिलांचं छत्रच हरवलं आहे. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. 

हृदयद्रावक! लेकीला जन्म देताच कोरोनामुळे मृत्यू; बाळाची एक झलकही पाहू शकली नाही आई

कोरोनामुळे एका नवजात बाळाने आपल्या आईला गमावलं आहे. लेकीला जन्म देताच कोरोनामुळे एका आईचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आपल्या बाळाची एक झलकही महिला पाहू शकली नाही. आयरलँड (Ireland) मध्ये एका गर्भवती महिलेने (Pregnant Woman) बाळाला जन्म दिल्यानंतरच कोरोनाने तिचा मृत्यू झाला आहे. 35 वर्षीय समांथा विलिस (Samantha Willis) यांना लोकांनी सुपरमॉमचा दर्जा दिला आहे. समांथा यांनी तब्बल 16 दिवस कोरोनाची झुंज दिली. मात्र त्यांची ही झुंज अखेर अपयशी ठरली. मुलीला जन्म दिल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने समांथाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

Web Title: Crime News Husband Died Due to corona girl was born, her father-in-law kicked her out of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.