पतीने किन्नर पत्नीची केली हत्या, दुसऱ्या पत्नीबाबत झाला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 12:47 PM2023-02-24T12:47:23+5:302023-02-24T12:47:37+5:30

Crime News : देवीनगर गावातील ही घटना आहे. इथे दिनेश हेम्ब्रम नावाच्या व्यक्तीने 40 वर्षीय किन्नर बबलू सोरेन उर्फ बबलीसोबत 10 वर्षाआधी लग्न केलं होतं.

Crime News : Husband killed transgender wife in Pakur district of Jharkhand | पतीने किन्नर पत्नीची केली हत्या, दुसऱ्या पत्नीबाबत झाला होता खुलासा

पतीने किन्नर पत्नीची केली हत्या, दुसऱ्या पत्नीबाबत झाला होता खुलासा

googlenewsNext

Crime News : झारखंडच्या पाकुड जिल्ह्यातून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने किन्नरसोबत लग्न केलं होतं. 10 वर्ष दोघे सोबत राहिले. त्यानंतर एका वादावरून त्याने किन्नर पतीची गळा आवळून हत्या केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याचा शोध घेत आहेत.

देवीनगर गावातील ही घटना आहे. इथे दिनेश हेम्ब्रम नावाच्या व्यक्तीने 40 वर्षीय किन्नर बबलू सोरेन उर्फ बबलीसोबत 10 वर्षाआधी लग्न केलं होतं. यादरम्यान बबलीला समजलं की, पती दिनेशला आणखी एक पत्नी आहे. यावरून दोघांमध्ये वाद होत होता. याच वादादरम्यान दिनेशने पत्नी बबलीची हत्या केली आणि तो फरार झाला.

घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. हत्येबाबत किन्नरचा भाऊ चंदन सोरेनने पोलिसांना सांगितलं की, दिनेशने बबलीसोबत आदिवासी रिती-रिवाजाप्रमाणे लग्न केलं होतं. दोघेही 10 वर्ष पती-पत्नीसारखे राहिले. दोघांमध्ये नेहमीच वाद होत होता. यावेळी झालेल्या वादातून बबलीचा जीव गेला.

चौकशी करत असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दिनेशला आणखी एक पत्नी आहे. तरिही त्याने किन्नर बबलीसोबत लग्न केलं. त्याने बबलीला आपल्या प्रेमात अडकवलं आणि जीवनभर सोबत राहण्याचा विश्वास दिला. पण तो दुसऱ्या पत्नीकडेही जात होता. त्यावरून दोघांमध्ये वाद होत होता. बबलीकडून पिच्छा सोडवण्यासाठी दिनेशने तिची हत्या केली आणि फरार झाला.

पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीला पकडण्यासाठी शोध घेतला जात आहे. बबलीच्या गळ्यावर जखमांच्या खुणा दिसत आहेत. 

Web Title: Crime News : Husband killed transgender wife in Pakur district of Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.