Crime News: ट्रिपल तलाक दिल्यानंतर पतीने सोशल मीडियावर टाकला अश्लिल व्हिडीओ, धक्का बसलेल्या पत्नीनं केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 02:10 PM2021-08-29T14:10:32+5:302021-08-29T14:11:14+5:30

Crime News: एका व्यक्तीने त्याच्या २५ वर्षीय पत्नीला ट्रिपल तलाक देत तिच्याशी नाते तोडले. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यानंतर त्याने एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

Crime News: Husband posts pornographic video on social media after triple divorce, shocked wife commits suicide | Crime News: ट्रिपल तलाक दिल्यानंतर पतीने सोशल मीडियावर टाकला अश्लिल व्हिडीओ, धक्का बसलेल्या पत्नीनं केली आत्महत्या

Crime News: ट्रिपल तलाक दिल्यानंतर पतीने सोशल मीडियावर टाकला अश्लिल व्हिडीओ, धक्का बसलेल्या पत्नीनं केली आत्महत्या

googlenewsNext

मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये एका व्यक्तीने त्याच्या २५ वर्षीय पत्नीला ट्रिपल तलाक देत तिच्याशी नाते तोडले. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यानंतर त्याने एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. (Crime News) त्यामुळे धक्का बसलेल्या महिलेने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. (Husband posts pornographic video on social media after triple divorce, shocked wife commits suicide)

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ही घटना भोपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक चतुर्वेदी म्हणाले की, आरोपी आणि या महिलेचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक १८ महिन्यांचा मुलगा आहे. आरोपीने सुमारे तीन महिन्यांपूर्वी ट्रिपल तलाक देऊन या महिलेशी असलेले नाते तोडसे होते. त्यानंतर सदर महिला मुलाला घेऊन आई-वडिलांकडे राहायला गेली होती.

या प्रकरणी १८ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार सदर महिलेने पतीवर तीन तलाक दिल्याचा आणि मुलाला तिच्याकडून जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलीस तपास करत असतानाच आरोपीने महिलेचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या महिलेने विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली.

Web Title: Crime News: Husband posts pornographic video on social media after triple divorce, shocked wife commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.