Crime News: पतीने सत्तुराने सपासप वार करून केला पत्नीचा अमानुषपणे खून, पोलिसांनी आवळल्या आरोपी पतीच्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 11:59 PM2022-01-25T23:59:12+5:302022-01-26T00:05:00+5:30
Crime News: व्यसनाधीन व कर्जबाजारी पतीसोबत राहण्यास नकार देणाऱ्या असहाय्य पत्नीची दारूच्या नशेत असणाऱ्या पतीने सत्तुराने सपासप वार करून अमानुषपणे खुन केला. ही घटना हुपरी येथे आज रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
कोल्हापूर - व्यसनाधीन व कर्जबाजारी पतीसोबत राहण्यास नकार देणाऱ्या असहाय्य पत्नीची दारूच्या नशेत असणाऱ्या पतीने सत्तुराने सपासप वार करून अमानुषपणे खुन केला. ही घटना हुपरी येथे आज रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.समिना इम्तियाज नदाफ(वय २७ सध्या रा. रेंदाळ)असे त्या पत्नीचे नाव आहे. इम्तियाज राजू नदाफ (वय ३२ रा.मुळगाव कोरोची सध्या रा. रेंदाळ)असे त्या निर्दयी पतीचे नांव आहे.पत्नीची हत्या करून घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या इम्तियाजला सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी पाठलग करून हत्यारासह पकडले.
दरम्यान या हल्ल्यात समिनाचे वडील ही जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी सी पी आर मध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, इम्तियाज व्यसनाधीन व कर्जबाजारी झाल्याने त्याच्यात व समिना मध्ये वारंवार वादविवाद व भांडणे होत असल्याने नाईलाजाने गेल्या कांही महिन्यांपासून इम्तियाजसोबत माहेरी रेंदाळ येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होती. पंधरा दिवसांपूर्वी इम्तियाजने नेहमीप्रमाणे भांडण करून प्रापंचिक साहित्यनिशी कोरोची येथे राहण्यासाठी गेला होता. मात्र त्याच्यासोबत समिना व दोन मुले गेली नव्हती. त्यामुळे तो मुलांनाही आपल्या कोरोची गावी बोलवत होता. त्यासाठी तो काल दिवसभर समिना व त्याच्या मुलांना सातत्याने फोन करीत होता मात्र त्याचा फोन कुणीही घेतला नाही.
हाच राग मनात धरून इम्तियाज आज रात्री 9च्या सुमारास हुपरीतील समिनाच्या वडिलांच्या गाड्यावर आला. यावेळी समिना वडिलांसोबत काम करत होती. आधीच दारूच्या नशेत असणाऱ्या इम्तियाजने यावेळी गाड्यावरील सत्तूर घेवून समिनाला मारण्याच्या हेतूने समिनाच्या अंगावर धावून गेला. त्यांने सतुराने केलेला वार चुकवून समिनाने तेथून धावत जात जवळच्याच इस्त्रीच्या दुकानात आसरा शोधण्याचा प्रयत्न केला. तेथे जावून इम्तियाजने समीना हिच्या खांद्यावर अत्यंत निर्दयी पणे सपासप वार करून तिचा खून केला. या वेळच्या हल्ल्यात समिना हिचे वडील ही जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारांसाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या इम्तियाजचा पाठलाग करून सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी त्याला रक्ताने माखलेल्या सत्तुरासह पकडले.या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.