"बाबा, 7 वर्षांपासून सहन करतेय पण आता..."; डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ, 2 मुलं झाली पोरकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 04:30 PM2022-01-20T16:30:16+5:302022-01-20T16:33:18+5:30

Crime News : एका महिला डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.

Crime News husband suspected of infidelity told my mother cant bear it now get me transferred | "बाबा, 7 वर्षांपासून सहन करतेय पण आता..."; डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ, 2 मुलं झाली पोरकी

"बाबा, 7 वर्षांपासून सहन करतेय पण आता..."; डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ, 2 मुलं झाली पोरकी

Next

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. संशयामुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. एका महिला डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. जबलपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने आत्महत्या करण्याआधी फॅमिली ग्रुपमध्ये याबाबत मेसेज पाठवला होता. "7 वर्षांपासून सहन करतेय. आता आणखी सहन होत नाही" असं म्हटलं होतं. किर्ती असं या डॉक्टरचं नाव असून वडील एमके जैन हे पशुपालन विभागाचे ACS कंसोटियााचे पीए आहेत. महिलेचा पती डॉ. स्वप्नील जैनवर संशय असून कुटुंबीयांनी त्याच्यावर किर्तीचा छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

पती रुग्णालयातून नेहमी उशिरा घरी येतो. मी आजारी असले तरी माझ्याकडे लक्ष देत नसल्याचं किर्तीने आपल्या आईला सांगितलं होतं. "माझ्याकडे आणि मुलांकडे अजिबात लक्ष देत नाही. क्लिनिकमध्ये तीन CCTV लावले आहेत, ज्यातील एक बंद आहे. एकाचं मेमरी कार्ड काढून टाकलं आहे. पाच दिवसांचं फुटेजदेखील डिलीट केलं आहे. हे सर्व का आहे? कोणाची भीती आहे? माझ्यापासून काय लपवलं जात आहे? आता खूप झालं. सात वर्षे झाली मी हे सर्व सहन करीत आहे. आता सहन नाही होत. तुम्ही मला भोपाळला ट्रान्सफर करून द्या, मी तेथेत नोकरी करेन" असं तिने म्हटलं होतं. 

जबलपूरच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. स्वप्नील जैन कटंगीचा राहणारा आहे. 2015 मध्ये त्याचं लग्न भोपाळ निवासी होमीओपथी डॉक्टर किर्ती जैन (32) सोबत झालं. त्यांना वंश (6) आणि वंशिका (18 महिने) असे दोन मुलं आहेत. यापूर्वी स्वप्नील जबलपूर रुग्णालयात काम करीत होता. सध्या त्याने स्वत:चं रुग्णालय सुरू केलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून डॉक्टर दाम्पत्यांमध्ये वाद सुरू होता. तसेच कीर्ती आपल्या पतीवर संशय घेत होती. स्वप्निलचे इतर मुलींसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय तिला होता. त्यामुळे त्यांनी घरापासून हॉस्पिटलपर्यंत सीसीटीव्ही लावले होते. ती अनेकदा रेकॉर्डिंग तपासण्यासाठी जात असे. तीन-चार दिवसांपूर्वी ती रेकॉर्डिंग तपासण्यासाठी पोहोचली, तेव्हा पाच दिवसांचे रेकॉर्डिंग डिलीट झाल्याचे आढळून आले. यावरून दोघांमध्ये वादही झाला होता. 

किर्तीने सोमवारी रात्री साधारण 10.45 मिनिटांनी गळफास घेतला. याआधी 8 वाजता तिने कुटुंबीयांच्या सोशल मीडियावर ग्रुपवर मेसेज पोस्ट केला. यात लिहिलं होतं की, तुम्हाला विनंती आहे. बाबांना सांगून मला भोपाळला ट्रान्सफर करा. आता अजून सहन होत नाही. मृत महिलेच्या वडिलांनी आरोप केला आहे की, लग्नाच्या वर्षापासूनच डॉ. स्वप्नील किर्तीला त्रास देत होता. तिने अनेकदा घरी याबाबत तक्रार केली होती. एकदा तर हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले होतं. स्वप्नीलने किर्तीसोबत चांगली वागणूक करणार असल्याचं लिहूनही दिलं होतं. त्यानंतरच तिला घरी पाठवल्याचं महिलेच्या वडिलांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: Crime News husband suspected of infidelity told my mother cant bear it now get me transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.