खळबळजनक! लेकाचा मृत्यू पाहून आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 10:38 AM2024-01-29T10:38:02+5:302024-01-29T10:53:26+5:30
ग्वाल्हेरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शहरातील मुरार केंट परिसरात मुलाच्या आत्महत्येनंतर त्याच्या आई-वडिलांनीही गळफास लावून आत्महत्या केली. आजूबाजूच्या लोकांच्याही हे लक्षात आलं नाही आणि तिघांचेही मृतदेह दोन दिवस लटकत राहिले. ग्वाल्हेरच्या हुरावली ए ब्लॉकमध्ये एक प्रॉपर्टी डीलर आणि त्याच्या पत्नीने आपल्या मुलाच्या आत्महत्येमुळे आत्महत्या केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचं समजतं. मात्र रविवारी पोलिसांना याची माहिती मिळाली.
पोलीस घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. त्यांना मुलाचा मृतदेह घराच्या पहिल्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला व आतमध्ये प्रॉपर्टी डीलर व त्यांच्या पत्नीचे मृतदेह रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. प्रॉपर्टी डीलर जीतू उर्फ जितेंद्र झा (51) आणि पत्नी त्रिवेणी झा (46) यांनीही मृत्यूला कवटाळलं. त्यांचा मुलगा अचल हा 17 वर्षांचा असून तो बारावीचा विद्यार्थी होता.
संपूर्ण कुटुंब सिरोलच्या ए ब्लॉक कॉलनीत राहत होते. दोन दिवसांपासून कुटुंबातील कोणीही फोन उचलत नसल्याने ही घटना लोकांना समजली. यानंतर जितेंद्रच्या शेजारी राहणारे सासरे तेथे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना मुलगा अचलच्या वहीत सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे तिघांनीही आत्महत्या केली असून त्यात आधी मुलाने मग पत्नीने आणि नंतर जितेंद्रने आत्महत्या केली आहे.
मुलाच्या आत्महत्येनंतर पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुसाईड नोटमध्ये प्रॉपर्टी डीलर जितेंद्र यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली असून हे सर्व मुलामुळे घडल्याचं म्हटलं आहे. माझ्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार पार्टनर देवेंद्र पाठक असून, त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असं त्यात लिहिलं आहे. देवेंद्र साक्षी अपार्टमेंटमध्ये राहतो आणि तो माझ्या मुलाला खूप त्रास देत होता असं सांगितलं. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.