घरात टाइल्स बसवूनही मजुरी दिली नाही, बदला घेण्यासाठी कारागिरानं लावली मर्सिडीजला आग अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 12:30 PM2022-09-14T12:30:20+5:302022-09-14T12:31:14+5:30
ही संपूर्ण घटना तेथे जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही जबरदस्त व्हारल होत आहे.
कामाची मजुरी न मिळाल्याने संतापलेल्या एका तरुणाने, दिल्लीतील सदरपूर कॉलनीत थेट एका मर्सिडीजलाच पेट्रोल ओतून आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारला आग लागवल्यानंतर बाईकवर आलेला हा तरुण घटनास्थळावरून फरार झाला. ही संपूर्ण घटना तेथे जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही जबरदस्त व्हारल होत आहे.
सदरपूर गावातील रहिवासी आयुष चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मर्सिडीज घराबाहेरच उभी होती. 11 सप्टेंबरला एक तरूण बाईकवरून आला. त्याने त्याची बाइक कारच्या समोर उभी केली. यानंतर, त्याने कारवर पेट्रोल शिंपडून आग लावली आणि घटना स्थळावरून फरार झाला. खरे तर काही वेळाने ही आग अपोआप विझली. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
केवळ 32 सेकेंदांच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कारला आग लावताना दिसत आहे. त्याने हेलमेट परिधान केले आहे. याप्रकरणी कार मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, आरोपी रणवीर हा ग्रेटर नोएडातील रोजा जलालपूर गावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली आहे.
घरात टाइल्स बसवूनही मजुरी दिली नाही, बदला घेण्यासाठी कारागिरानं लावली मर्सिडीजला आग #Delhi#CrimeNewspic.twitter.com/j4LpT8Ql94
— Lokmat (@lokmat) September 14, 2022
घरात टाइल्स लावल्याची मजुरी दिली नाही -
एसीपी रजनीश वर्मा यांनी दिलेल्यया माहितीनुसार, रणवीर हा मूळचा बिहारचा आहे. तो तेथून कामासाठी नोएडा येथे आला होता. तो घरांमध्ये टाइल्स बसवण्याचे काम करतो. आरोपीचा रणवीर याने दावा केला आहे, की आयुष चौहान यांनी त्यांच्या घरी त्याच्याकडून टाइल्स बसवून घेतल्या. चौहान यांच्याकडून त्याचे 2.68 लाख रुपयांचे येणे बाकी आहे. अनेकवेळा पैसे मागूनही पैसे न दिल्याने त्याने रागाच्या भरात त्यांची कार पेटवून दिली. तसेच, आयुष यांचे म्हणणे आहे, की त्यानी संबंधित आरोपीचे सर्व पेमेंट केले होते. तो खोटे बोलत आहे.