Crime News: प्रेयसीने प्रेमात दगा दिला; तरुणाने FB लाईव्ह करून ग्राईंडरने गळा कापून घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 12:32 PM2022-11-09T12:32:05+5:302022-11-09T12:32:39+5:30

लाईव्हमध्ये या तरुणाने प्रेयसीच्या घराच्यांवरही आरोप केले आहेत. लाईव्ह पाहून अनेक ओळखीच्या लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतू त्याने त्यांचे ऐकले नाही.

Crime News in UP: lover betrayed in love; young man cut his throat with a grinder on FB live | Crime News: प्रेयसीने प्रेमात दगा दिला; तरुणाने FB लाईव्ह करून ग्राईंडरने गळा कापून घेतला

Crime News: प्रेयसीने प्रेमात दगा दिला; तरुणाने FB लाईव्ह करून ग्राईंडरने गळा कापून घेतला

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या महारजगंज जिल्ह्यात एका तरुणाने आपल्या फेसबुकवर लाईव्ह करत लाकूड, फरशा कापतात त्या ग्राईंडरने गळा कापून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या घरी जात मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविला आहे. 

तरुणाच्या आत्महत्या करण्याच्या पद्धतीवरून पोलिसही हादरले आहेत. या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तिने त्याला दगा दिला, यामुळे या तरुणाने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. पुरन्दरपुर पोलीस ठाणे हद्दीतील भगवानपूर भागातील ही घटना आहे. या तरुणाने तिच्या प्रेयसीवर प्रेमात फसविल्याचा आरोप करत फेसबुक लाईव्ह केले होते. यावेळी त्याने ग्राईंडरने गळा कापून घेत आत्महत्या केली. 

लाईव्हमध्ये या तरुणाने प्रेयसीच्या घराच्यांवरही आरोप केले आहेत. लाईव्ह पाहून अनेक ओळखीच्या लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतू त्याने त्यांचे ऐकले नाही. हा तरुण त्याच गावातील तरुणीवर प्रेम करत होता. तिच्याशीच लग्न करायचे होते. मात्र, तिचे लग्न तिच्या घरच्यांनी दुसरीकडेच ठरवून टाकले होते. यामुळे तो नाराज झाला होता. फेसबुक लाईव्हमध्ये त्याने मुलीचे व तिच्या कुटुंबाचे नाव घेत गळा कापला आहे. 

हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली होती. पोलिसांनीही हा व्हिडीओ पाहिला तेव्हा लाईव्ह आत्महत्येचा प्रकार पाहून ते देखील थबकले होते. 
 

Web Title: Crime News in UP: lover betrayed in love; young man cut his throat with a grinder on FB live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.