Crime News: गुंतवणूकदारांची पावणेतीन कोटींची फसवणूक, ४० आठवड्यांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 08:59 AM2022-02-03T08:59:22+5:302022-02-03T08:59:34+5:30

Crime News: ४० आठवड्यांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीस भाईंदरच्या नवघर पोलिसांनी कोणाच्या तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून अटक केली आहे. ५८७ गुंतवणूकदारांकडून २ कोटी ७३ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम आरोपीने गोळा केली आहे. 

Crime News: Investors cheated of Rs 3 crore, tempted to double money in 40 weeks | Crime News: गुंतवणूकदारांची पावणेतीन कोटींची फसवणूक, ४० आठवड्यांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष

Crime News: गुंतवणूकदारांची पावणेतीन कोटींची फसवणूक, ४० आठवड्यांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष

Next

 मीरा रोड : ४० आठवड्यांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीस भाईंदरच्या नवघर पोलिसांनी कोणाच्या तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून अटक केली आहे. ५८७ गुंतवणूकदारांकडून २ कोटी ७३ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम आरोपीने गोळा केली आहे.

भाईंदर पूर्वेच्या पंचरत्न इमारतीत रवींद्र शिवाजी जरे, रा. इंद्रलोक, भाईंदर पूर्व हा अस्मिता एंंटरप्राईजेस नावाने बेकायदेशीररित्या ४० आठवडे मुदतीची बोगस गुंतवणूक योजना चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुंतवणुकीच्या रकमेवर प्रती आठवडा ५ टक्के परतावा यानुसार ४० आठवड्यांत रक्कम दुप्पट करून देण्यासह गुंतवणूकदारांना आकर्षीत करणाऱ्या एजंटला १ ते ४ टक्केपर्यंत कमिशन दिले जात होते. किमान १० हजार गुंतवण्याचे बंधन होते. यातून लोकांची फसवणूक होण्याची खात्री पोलिसांना पटली.

नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई, निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, उपनिरीक्षक राम कदम व प्रमोद पाटील यांच्या पथकाने चौकशी सुरू केली. पोलीस अधिकारी हे एका खासगी व्यक्तीसह गुंतवणूकदार बनून जरे याला भेटले. त्याला गुंतवणूक योजना व परतावा आणि गोळा होणाऱ्या पैशांचा काय विनियोग करतो याबाबत विचारपूस केली. त्यावेळी जरे याने आपण शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असून, त्यातून प्रती आठवडा ५ टक्के परतावा देत असल्याचे सांगितले. परंतु जरे हा गुंतवणूक योजना चालवण्याचा सक्षम प्राधिकरणाचा परवाना दाखवू शकला नाही. त्यामुळे दोन पथके बनवून जरे याच्या कार्यालय व घरावर छापा टाकला.

११ लाख ७१ हजाराचा ऐवज जप्त
- झडतीदरम्यान आरोपीच्या घर व कार्यालयामधून गुंतवणूकदारांची यादी, गुंतवणूकदारांना देण्यात आलेल्या पावत्या, माहिती पत्रक, इत्यादी कागदपत्रे व ११ लाख ७१ हजार रोख असा मुद्देमाल पोलिसांना सापडला. 
- रवींद्र जरे याच्यावर फसवणूक व बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 

सात खाती गोठवली
- जून २०२१ पासून सुमारे ५८७ गुंतवणूकदारांकडून २ कोटी ७३ लाख ६८ हजार रक्कम जमा.
- एजंटना १ ते ४ टक्क्यापर्यंत कमिशनही दिले. 
- पोलिसांनी ७ बँक खाती गोठवली. खात्यात २४ लाख रुपये.
- न्यायालयाने सुनावली १० दिवसांची पोलीस कोठडी. 

 

Web Title: Crime News: Investors cheated of Rs 3 crore, tempted to double money in 40 weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.